Mumbai Corona Update: मुंबईत कोरोनाचा उद्रेक; २४ तासांत १०,८६० नव्या रुग्णांची नोंद

Mumbai Corona Update: मुंबईत कोरोनाचा उद्रेक; २४ तासांत १०,८६० नव्या रुग्णांची नोंद

Mumbai Corona Update: मुंबईत कोरोनाचा उद्रेक; २४ तासांत १०,८६० नव्या रुग्णांची नोंद

मुंबईत दिवसेंदिवस नव्या कोरोनाबाधितांची संख्येत मोठी वाढ होत आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल चहल यांनी दैनंदिन रुग्णसंख्या २० हजार पार झाली तर लॉकडाऊन लावला जाईल असा इशारा दिला आहे. आज दैनंदिन नव्या कोरोनाबाधितांची मुंबईतील संख्या १० हजार पार गेली आहे. गेल्या २४ तासांत मुंबईत १० हजार ८६० नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली असून २ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर ६५४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. मुंबईतील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ८ लाख १८ हजार ४६२वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत १६ हजार ३८१ जणांचा मृत्यू झाला असून ७ लाख ५२ हजार १२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईत आज ४० ओमिक्रॉनबाधित आढळले आहेत. त्यामुळे मुंबईतील एकूण ओमिक्रॉनबाधितांची संख्या ४०८ झाली आहे.

मुंबईत आज मृत्यू झालेले दोन्ही रुग्णांना काही दीर्घकालीन आजार होते. तसेच दोन्ही रुग्ण पुरुष होते आणि त्यांचे वय ६० वर्षावर होते. एकाबाजूला मुंबईत नव्या कोरोनाबाधितांची संख्या मोठी दिसत असली तर दुसऱ्याबाजूला दिलासादायक बाब म्हणजे यापैकी ९० ते ८९ रुग्ण लक्षणे नसलेले बाधित आहेत. आज आढळलेल्या १० हजार ८६० नव्या कोरोनाबाधितांपैकी ९ हजार ६६५ रुग्ण एसिप्टोमॅटिक म्हणजेच लक्षणे नसलेले बाधित आहेत. सध्या मुंबईत ४७ हजार ४७६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

आज दिवसभरात मुंबईत ४९ हजार ६६१ जणांच्या कोरोना चाचण्या झाल्या असून आतापर्यंत १ कोटी ३८ लाख ६४ हजार ५९४ चाचण्या झाल्या आहेत. मुंबईतील बरे झालेल्या रुग्णांचा दर ९२ टक्के आहे. तर मुंबईतील रुग्ण दुप्पटीचा दर ११० दिवस आहे. तसेच मुंबईतील सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या ३८९ आहे.


हेही वाचा – Mumbai Lockdown : …तर लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही, पालिका आयुक्तांचे मोठे संकेत


First Published on: January 4, 2022 7:40 PM
Exit mobile version