अवघ्या एक तासात अकराशे अर्जदारांनी केली नोंदणी

अवघ्या एक तासात अकराशे अर्जदारांनी केली नोंदणी

अवघ्या एक तासात अकराशे अर्जदारांनी केली नोंदणी

म्हाडाच्या मुंबई मंडळाने ५ नोव्हेंबरला घरांच्या लॉटरीसाठी ऑनलाइन नोंदणीला सुरुवात केली. ही नोंदणी १० डिसेंबरपर्यंत असणार आहे. सोमवारी म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांच्या हस्ते ‘गो लाइव्ह’ हा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमानंतर दुपारी २ वाजता म्हाडाच्या लॉटरीच्या घरांसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणी आणि अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली. त्यानंतर तासाभरातच ११०६ अर्जदारांनी नोंदणी करुन घेतली. सोमवारी संध्याकाळी ६ वाजेपर्यंत २४०० अर्जदारांनी नोंदणी केली. त्याचबरोबर ७०० अर्जदारांनी ऑनलाइन अर्ज भरुन सादरही केले.

हेही वाचा – अखेर म्हाडाच्या लॉटरीला दिवाळीचा मुहूर्त मिळाला

मिळालेला प्रतिसाद चांगला आहे – उदय सामंत

म्हाडाच्या घरांसाठी मिळालेला प्रतिसाद चांगला असल्याचे म्हाडाचे मुंबई मंडळाचे अध्यक्ष उदय सामंत म्हणाले आहेत. यावर्षी १३८४ घरांसाठी ही लॉटरी निघाली आहे. त्याचबरोबर गेल्यावर्षीच्या घरांच्या किंमतीपेक्षा यावर्षीच्या घरांची किंमत २५ ते ३० टक्यांनी कमी करण्यात आली आहे. त्यामुळे यावर्षी जास्तीत जास्त अर्ज येतील असा विश्वाव आपल्याला आहे, असेही सामंत म्हणाले.

हेही वाचा – गिरणी कामगारांसाठी म्हाडा गृहप्रकल्प उभारणार

तुम्हालाही अर्ज भरायचा आहे का?

‘मुंबईत हक्काचं घर’ असावं असं सर्वसामान्यांचं स्वप्न ‘म्हाडा’च्या माध्यमातून पूर्ण होतं असतं. मुंबईत स्वत:चं घर घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी म्हाडाने दिवाळीच्या मुहूर्तावर एक आनंदाची बातमी आणली आहे. म्हाडाच्या तब्बल १३८४ घरांसाठी लॉटरी काढण्यात येणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या बहुर्चित लॉटरीच्या सर्वचजण प्रतिक्षेत होते. मात्र, आता ही प्रतिक्षा संपवत म्हाडाने याबाबतची अधिकृत जाहिरात जारी केली आहे. या लॉटरीमधील घरांसाठी सोमवार ५ नोव्हेंबरला (आज) दुपारी २ वाजल्यापासून अर्जनोंदणीची सुरुवात झाली. ही अर्जनोंदणी पूर्णत: ऑनलाईन असणार आहे. येत्या १० डिसेंबर रात्री १२ वाजेपर्यंतच्या कालावधीत हे अर्ज भरता येणार आहेत. त्यानंतर १६ डिसेंबरला सकाळी १० वाजता १३८४ घरांची लॉटरी (सोडत) काढली जाणार आहे. यानिमित्ताने पुन्हा एकदा सर्वसामान्य लोकांचं परवडेल अशा दरात घर घेण्याचं स्वप्न पूर्ण होणार आहे. तुम्हीसुद्धा ऑनलाईन अर्ज भरण्यास इच्छुक असाल तर खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी : https://lottery.mhada.gov.in/OnlineApplication/Mumbai/


हेही वाचा – म्हाडा लॉटरी: १० डिसेंबरपर्यंत भरा अर्ज

First Published on: November 6, 2018 11:36 AM
Exit mobile version