घरमुंबईअखेर म्हाडाच्या लॉटरीला दिवाळीचा मुहूर्त मिळाला

अखेर म्हाडाच्या लॉटरीला दिवाळीचा मुहूर्त मिळाला

Subscribe

येत्या ५ नोव्हेंबरला म्हाडाच्या १३०० घरांची ऑनलाइन लॉटरी जाहीर होणार आहे. ऑनलाइन अर्ज भरण्यापासून ते स्वीकृती आणि छाननीसाठी ४५ दिवसांचा कालावधी देण्यात येणार आहे. त्यानंतर २३ ते २३ डिसेंबरला लॉटरी फुटणार आहे.

म्हाडाच्या मुंबई मंडळाची लॉटरी बऱ्याच दिवसांपासून रखडली होती. या रखडलेल्या लॉटरीला अखेर दिवाळीचा मुहूर्त मिळाला आहे. लोकमत वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार येत्या दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर म्हणजे ५ नोव्हेंबरला तब्बल १३०० घरांसाठी लॉटरीची जाहिरात प्रसिद्ध होणार असून २० ते २५ डिसेंबर दरम्यान लॉटरी फुटणार आहे. याअगोदर म्हाडाने ११९४ घरांची लॉटरी लागणार आसल्याची माहिती दिली होती. मात्र आता यामध्ये वाढ करण्यात आली असून १३०० घरांसाठी लॉटरी काढण्यात येणार आहे, अशी माहिती म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी दिली.

हेही वाचा – म्हाडाची मुंबईची सोडत दिवाळीनंतर ?

- Advertisement -

यावर्षीच्या लॉटरीतील घरांच्या किमतीही कमी

म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी सांगितले की, सर्वसामान्य मुंबईकरांना परवडेल त्या भावात स्वत:चे घर मिळावे या उद्देशाने म्हाडाने यावर्षी घरांची किंमती कमी केल्या आहेत. गेल्या लॉटरीपेक्षा यावर्षीच्या लॉटरीच्या घरांच्या किमती २५ ते ३० टक्क्यांनी कमी करण्यात आल्या आहेत. कोणत्या ठिकाणी किती घरे आहेत यानुसार म्हाडाने १३०० घरांच्या किंमती निश्चित केल्या आहेत. म्हाडाची १००० घरांची लॉटरी मे २०१८ मध्ये घोषित करण्यात येणार होती. परंतु, म्हाडाकडे जागाच उपलब्ध नसल्यामुळे लॉटरी घोषित करण्यात आली नाही.

हेही वाचा – माहुलवासीयांना मिळणार म्हाडाची ३०० घरे

- Advertisement -

म्हाडाकडे लोकांनी पाठ फिरवली होती

कोकण मंडळाच्या लॉटरीत घरांच्या किंमती वाढल्या होत्या. त्यामुळे लॉटरी विजेत्यांकडून नाराजी व्यक्त केली जात होती. काही विजेत्यांनी तर घरेही परत केली होती. त्यामुळे म्हाडावर भरपूर टीका केल्या जात होत्या. यापासून बोध घेत म्हाडाच्या मुंबई मंडळाने घरांच्या किंमती कमी केल्या आहेत.


हेही वाचा – म्हाडाच्या कार्यकारी अभियंताला लाच घेताना अटक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -