मुंबईत २४ तासात तब्बल ११४ कावळ्यांचा मृत्यू

मुंबईत २४ तासात तब्बल ११४ कावळ्यांचा मृत्यू

bird flu: मुंबईत २४ तासात ११४ कावळ्यांचा मृत्यू

राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून बर्ड फ्ल्यूचा संसर्ग वाढत आहे. बर्ड फ्ल्यूमुळे मोठ्याप्रमाणात कावळे, कोंबड्यांचा मृत्यू झाल्याचा घटना समोर येत आहे. त्यातच आता गेल्या २४ तासात मुंबईत ११४ कावळ्यांचा मृत्यू झाल्याच्या तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत. पालिकेने तयार केलेल्या हेल्पलाईनवर गेल्या १५ दिवसांपासून कावळे, कबुतरे, चिमण्या मृत पावल्याबाबत तब्बल २ हजार ४०४ तक्रारीची नोंदी झाल्या आहेत. ५ जानेवारीपासून मुंबईत कावळे, कबुतरे, चिमण्यांनाच्या मृत्यू होण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे मुंबईत बर्ड फ्ल्यूच्या चर्चांना उधाण आले आहे. त्यामुळे पालिकेने अंडी, मांस, चिकन चांगले शिजवून खाण्याचे आवाहन केले आहे.

परंतु तरीही अनेक मुंबईकरांनी बर्ड फ्ल्यूच्या भीतीने चिकन, अंडी खाणे बंद केले आहे. त्यामुळे मुंबईकरांमध्ये बर्ड फ्ल्यूची भीती वाढताना दिसत आहे.  मुंबईत गेल्या ५ जानेवारीपासून कावळे, कबुतरे मृत पावल्याच्या घटनासत्राला सुरुवात झाली. त्यानंत गिरगाव, चेंबूरसारख्या मुंबईच्या अनके ठिकाणाहून कावळे, कबुतरे, मृत पावल्याच्या घटना वारंवार घडत आहेत. मुंबईतील मालाड, दादर, सायन, माटुंगा, बोरिवली, कांदिवली, अंधेरी, प्रभादेवी, वडाळा,माटुंगा, सायन, मानखुर्द, गोवंडी, चंदनवाडी आदी परिसरातही कावळे कबुतरे मृत पावल्याच्या तक्रारी पालिकेच्या हेल्पलाईनवर येत आहेत. मुंबईत बर्ड फ्ल्यूचा धोका वाढत असल्याने पालिकेने नागरिकांना भयभित न होता पालिका आपत्कालीन व्यवस्थापन विभागातील १९१६ या हेल्पलाईनवर मृत पक्षांबाबत तक्रारी करण्याचे आवाहन केले होते. यानुसार पालिकेकडे आता मृत कावळे व कबुतरे यांच्याबाबत तक्रारींचा ओघ वाढू लागला आहे.

First Published on: January 24, 2021 8:47 PM
Exit mobile version