घाटकोपरमध्ये १५ ते १६ जणांना कुत्र्याचा चावा

घाटकोपरमध्ये १५ ते १६ जणांना कुत्र्याचा चावा

घाटकोपरमध्ये १५ ते १६ जणांना कुत्र्याचा चावा

घाटकोपर रमाबाई आंबेडकर नगर येथील पिसाळलेल्या कुत्र्याने जवळपास १५ ते १६ रहिवाशांना चावा घेतल्याची घटना घडली आहे. गुरुवारी संध्याकाळी ६ वाजताच्या दरम्यान ही घटना घडली. या सर्व रहिवाशांवर घाटकोपरच्या राजावाडी या पालिका हॉस्पिटलमध्ये उपचार करुन घरी सोडण्यात आले असल्याची माहिती हॉस्पिटलच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. विद्या ठाकूर यांनी दिली आहे.

कुत्र्याच्या दहशतीने त्रस्त झालेल्या लोकांनी स्थानिक प्रशासनाकडे तक्रार केली आहे. घाटकोपर पश्चिम येथील रमाबाई आंबेडकर नगरातील रहिवासी यामुळे भीतीच्या छायेत जगत आहेत. ही एका कुत्र्याची भीती आहे जी लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकालाच जाणवतेय. स्थानिक रहिवासी अजय हाटे यांचा मुलगा समर्थ गुरुवारी सायंकाळी सहाच्या सुमारास घराबाहेर खेळत असताना अचानक एका पिसाळलेल्या कुत्र्याने त्याच्या डाव्या पायाला चावा घेतला. त्यानंतर रस्त्यावरुन चालणाऱ्या अनेक रहिवाशांना या कुत्र्याने चावा घेतल्याचे प्रत्यक्षदर्शी सांगतात.


हेही वाचा – जेजेतील इंट्रा व्हॅस्कूलर लिथोट्रीप्सी पद्धतीने वाचवले वृद्धाचे प्राण


या कुत्र्याने आतापर्यंत १५ ते १६ जणांना चावा घेतला आहे. शिवाय, समर्थच्या आईसोबत या विषयी संपर्क केला असता त्यांनी सांगितलं की, “पालिकेच्या ऑफिसमध्ये या विषयी तक्रार देण्यात आली आहे. पण, तो कुत्रा पकडण्यासाठी आतापर्यंत कुणीही आलेले नाही. लोक घाबरले आहेत. समर्थ बाहेर खेळत असताना त्याच्या डाव्या पायाला कुत्र्याने चावा घेतल्याने तो रडत रडत घरी आला. त्याला आधी आम्ही स्थानिक दवाखान्यात घेऊन गेलो. त्यानंतर राजावाडी मध्ये अँटीरेबीजची लस घेतली.”
तर, या घटनेला राजावाडी हॉस्पिटलच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. विद्या ठाकूर यांनी दुजोरा देत हॉस्पिटलमध्ये एकाच ठिकाणांहून काही वेळाच्या अंतराने स्थानिक रहिवासी कुत्रा चावल्याची तक्रार घेऊन दाखल झाले होते. शुक्रवारी सकाळी ही कुत्रा चावल्याची एकूण २५ प्रकरणे उघडकीस आली आहेत. त्यापैकी १५ ते १६ लोक हे एकाच भागातील आहेत. त्यांना अँटी रेबीजची लस देऊन डिस्चार्ज देण्यात आला आहे.”

 

First Published on: February 28, 2020 9:39 PM
Exit mobile version