Corona Update: आज मुंबईत कोरोनाचे १५४० नवे रुग्ण तर ९७ जणांचा मृत्यू

Corona Update: आज मुंबईत कोरोनाचे १५४० नवे रुग्ण तर ९७ जणांचा मृत्यू

Mumbai Corona Update: मुंबईच्या रुग्णसंख्येत घट, रिकव्हरी रेट ९३ टक्क्यावर

मुंबईमध्ये गुरुवारी १५४० नवे रुग्ण सापडल्याने कोरोनाबाधितांची संख्या ५३ हजार ९८५ वर पोहचली आहे. त्याचप्रमाणे ९७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा १९५२ वर पोहोचला आहे. तसेच गुरुवारी ५१६ रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत २७ हजार ८२४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

मुंबईमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये सातात्याने वाढ होत असून, गुरुवारी मुंबईमध्ये ९७ जणांचा मृत्यू झाला असून, त्यामध्ये ६५ जणांना दीर्घकाळ आजार होते. यामध्ये ६३ पुरुष तर ३४ महिलांचा समावेश आहे. मृतांमधील १० जणांचे वय ४० वर्षांखाली आहे आणि ५३ जण हे ६० वर्षांवरील, तर ३४ जण हे ४० ते ६० वर्षादरम्यान होते.

मुंबईत कोरोनाचे ७३१ संशयित रुग्ण सापडल्याने मुंबईतील संशयित कोरोना रुग्णांची संख्या ३९ हजार १८३ वर पोहचली आहे. तसेच ५१६ रुग्णांना घरी सोडण्यात आल्याने आतापर्यंत मुंबईतून तब्बल २४ हजार २०९ जणांना घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत मुंबईमध्ये २ लाख ४२ हजार ९२३ कोविड चाचण्या करण्यात आल्या आहेत. ३ ते १० जूनदरम्यान मुंबईतील कोविड रुग्ण सापडण्याचा दर हा ३ टक्के राहिला आहे, अशी माहिती पालिकेच्या साथरोग कक्षाकडून देण्यात आली.


हेही वाचा – Corona Update: दिवसभरात राज्यात आढळले ३,६०७ नवे कोरोनाबाधित; १५२ जणांचा मृत्यू


 

First Published on: June 11, 2020 9:24 PM
Exit mobile version