पूर मुद्याकडे गांभीर्याने पाहा

पूर मुद्याकडे गांभीर्याने पाहा

२६ जुलै

पूरव्यवस्थापनाबाबत जेवढी जनजागृती व्हायला हवी, तेवढी पुरेशी झालेली नाही. केवळ मुंबईतच नव्हे तर महाराष्ट्रात या प्रकारच्या जनजागृतीची गरज आहे. प्रत्येक महापालिका आणि नगरपालिकांना भूसर्वेक्षण करून त्या त्या ठिकाणच्या जमिनीवरील नाल्यांची उंची किती आहे, हे ठरवून तसेच तेथील पाण्याचा हिशोब करून शास्त्रशुध्द रचना करायला हवी. त्यामुळे पूर या मुद्दयाकडे गांभिर्याने पाहण्याची गरज असल्याचेही मत, असे ज्येष्ठ जलतज्ज्ञ डॉ. माधवराव चितळे यांनी ‘आपलं महानगर’शी बोलतांना व्यक्त केले.

२६ जुलै २००५च्या महाप्रलयंकारी पावसाने मुंबईला जलमय करून टाकले. या ढगफुटीमुळे एकाच दिवशी ९४४ मि.मी एवढा धो धो पाऊस पडून संपूर्ण मुंबईत पूरपरिस्थिती निर्माण झाली. या महापुराने १०९४ लोकांचे बळी गेले. त्यामुळे तुंबलेल्या या मुंबईची कारणे शोधण्यासाठी तत्कालिन मुख्यमंत्र्यांनी जलतज्ज्ञ माधवराव चितळे यांच्या अध्यक्षतेसाठी सत्यशोधन समिती गठीत केली. या समितीच्या शिफारशीनुसार तसेच ब्रिमस्टोवॅडच्या नुसार मुंबईतील नदी व नाल्यांचे रुंदीकरण व पंपिंग स्टेशनचे काम हाती घेतल

मुंबई महापालिकेने नद्यांसह नाल्यांच्या पात्रांचे रुंदीकरण केले. पण परिस्थिती मात्र ‘जैसे थे’च आहे. त्यामुळे महापालिका पुन्हा एकदा मोठा जलप्रलय होण्याची वाट पाहतेय का असा सवाल उपस्थित केला जात आहे.२६ जुलैच्या महापुरामध्ये शेकडो लोकांचे बळी गेले आहेत. केवळ मुंबईतच नाही तर राज्यातील इतर भागातही या जलप्रलयाने हाहाकार माजवला होता. राज्यात यामुळे हजारो लोकांचे बळी गेले होते. आज या घटनेला १४ वर्षे पूर्ण होत आहे. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ जलतज्ज्ञ माधवराव चितळे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी मुंबईसह राज्यात पूरव्यवस्थापनाबाबत जेवढी जनजागृती व्हायला पाहिजे तेवढी होत नसल्याची खंत व्यक्त केली.

लोकांचा कल हा नागरीकरणाकडे आहे. त्यामुळे नाल्यांभोवतीच्या सखल जमिनींचा वेगवेगळया कारणांसाठी विकास केला जात आहे. त्यामुळे जेव्हा पावसामुळे पूर येतो, तेव्हा त्यात नागरिकांचे मोठे नुकसान होते. त्यामुळे अशाप्रकारच्या नुकसान प्रवण क्षेत्रांचे संरक्षण स्थानिक स्वराज्य संस्थांनी करून त्यावर नियंत्रण आणणे आवश्यक असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.सर्व महापालिका आणि नगरपालिकांनी अशाप्रकारे नाल्यांलगतच्या जमिनींवर नियंत्रण आणणे आवश्यक आहे. परंतु मुंबईसह इतर ठिकाणीही आपण फार कच्चे आहोत,अशी खंतही त्यांनी व्यक्त केली आहे.

पुरापासून आपले नुकसान झाले की नंतर आपण विसरुन जातो आणि त्यानंतरच्या उर्वरीत ११ महिन्यांमध्ये त्याचा उपद्रव नसतो. त्यामुळे तसे बरोबर नाही.पूर या मुद्याकडे अधिक गांभिर्याने पाहिले तर समाजाचे बरे होईल,असे त्यांनी म्हटले आहे.

First Published on: July 26, 2019 6:57 AM
Exit mobile version