नागपूरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात ९ प्राण्यांचा मृत्यू

नागपूरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात ९ प्राण्यांचा मृत्यू

नागपूरमधील गोरेपाडा प्राणी संग्रहालयात बिबट्याने केलेल्या हल्ल्यात तब्बल ९ प्राण्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. बिबट्याने प्राणी संग्रहालयातील इतर प्राण्यांच्या पिंजऱ्यात शिरून हा हल्ला चढवला. या हल्ल्यात ५ चितळ, ३ काळवीट आणि एक चौसिंगा यांचा मृत्यू झाला आहे. हा बिबट काटोल मार्गावर असलेल्या गोरेवाडा जंगलातून आला असल्याचे सांगण्यात येते. विशेष म्हणजे गोरेवाडा केंद्राला इलेक्ट्रॉनिक्स तारेचे कुंपण असूनही बिबट्याने ते ओलांडून प्रवेश केला व प्राण्यांवर हल्ला चढवला. बुधवारी सकाळी वनकर्मचाऱ्यांच्या निदर्शनास ही बाब आली.

(सविस्तर वृत्त लवकरच…)

 

हेही वाचा –

पुणे : मुंढवा – केशवनगर येथे धुमाकुळ घालणारा बिबट्या जेरबंद

पुण्यातील मुंढवा भागात बिबट्याचा धुमाकूळ; ४ ते ५ जणांवर केला हल्ला

गंगापूर गावाजवळ शेतीच्या रक्षणासाठी पाळलेल्या डॉबरमनलाच बिबट्याने केले फस्त

First Published on: February 6, 2019 12:54 PM
Exit mobile version