घरमहाराष्ट्रपुणे : मुंढवा - केशवनगर येथे धुमाकुळ घालणारा बिबट्या जेरबंद

पुणे : मुंढवा – केशवनगर येथे धुमाकुळ घालणारा बिबट्या जेरबंद

Subscribe

मुंढवामधील केशवनगर परिसरात धुमाकुळ घालणाऱ्या बिबट्याला दोन तासाने जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे.

पुण्यातील मुंढवामधील केशवनगर परिसरातील रेणुका मंदिर परिसरात सोमवारी सकाळी ९ च्या सुमारास बिबट्या आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती. या घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते. वनविभागाने ३ तुकट्यांमध्ये पथक विभागून बिबट्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्या दरम्यान, बिबट्या बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या खड्ड्यांमध्ये पडल्याचे सांगण्यात आले. त्यानुसार सापळा लावून अखेर बिबट्या दोन तासाने जेरबंद करण्यात यश आले आहे.

बिबट्याचा तीन ते चार जणांवर हल्ला

मुंढवामधील केशवनगर परिसरातील रेणुका मंदिर बिबट्याचा धुमाकुळ सुरु होता. बिबट्या दिसताच संपूर्ण परिसरात भितीचे वातावरण पसरले होते. तसेच या बिबट्यांने ७ वर्षाच्या मुलावर हल्ला केला होता, या मुलाला वाचवताना इतर ३ जणांवर बिबट्याने हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, अग्निशमनचे बचाव पथक, वनविभाग, कात्रज येथील प्राणी संग्राहलायाच्या टीम यांनी संयुक्त कारवाईद्वारे जाळी टाकून बिबट्याला पकडण्यात वनविभागाच्या पथकाला यश आले आहे. बिबट्याच्या या हल्ल्यात एक वृद्ध स्त्री जखमी झाली असून आदित्य भंडारी नामक तरुणही यात जखमी झाला असल्याची माहिती समोर आली आहे.

- Advertisement -

वाचा – पुण्यातील मुंढवा भागात बिबट्याचा धुमाकूळ; ४ ते ५ जणांवर केला हल्ला


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -