घरमहाराष्ट्रपुण्यातील मुंढवा भागात बिबट्याचा धुमाकूळ; ४ ते ५ जणांवर केला हल्ला

पुण्यातील मुंढवा भागात बिबट्याचा धुमाकूळ; ४ ते ५ जणांवर केला हल्ला

Subscribe

पुण्यातील मुंढवामधील केशवनगर परिसरात सोमवारी सकाळी ९ च्या सुमारास बिबट्या घुसला असून त्याने तेथील ४-५ जणांवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

पुण्यातील मुंढवामधील केशवनगर परिसरात आज, सोमवारी सकाळी ९ च्या सुमारास बिबट्या घुसला असून त्याने तेथील ४-५ जणांवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून ३ तुकट्यांमध्ये विभागलेले हे पथक बिबट्याचा शोध घेत आहेत. केशवनगर परिसरातील रेणुका माता मंदिरामागे बिबट्याने ४ ते ५ जणांवर हल्ला केला आहे. बिबट्याच्या तावडीतून एका मुलाला सोडवताना तिघे जण जखमी झाल्याचे समजते. या हल्ल्यानंतर बिबट्या बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या खड्ड्यांमध्ये पडल्याचे सांगण्यात येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -