उल्हासनगरात पकडला 9 लाखांचा गुटखा

उल्हासनगरात पकडला 9 लाखांचा गुटखा

अवैध गुटखा विक्री

मध्यवर्ती पोलिसांनी एका गोडाउनमध्ये छापा टाकून वेगवेगळया किंमतीचा, वेगवेगळया प्रकाराचा प्रतिबंधित गुटख्याचा सुमारे 9 लाख 19 हजार 460 रूपये किंमतीचा माल जप्त करून एकाला अटक केली आहे. उल्हासनगर शहरात मोठ्या प्रमाणात गुटखा विकला जात आहे. सी ब्लॉक येथील महापालिका शाळा क्रमांक 17 जवळ एका उघड्या गाळ्यात मोठ्या प्रमाणात गुटखा साठवला असल्याची माहिती मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर सुरडकर यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक अस्लम खातीब, पोलीस उप निरीक्षक हर्षल काळे यांच्या पथकाने धाड टाकली. त्या गोडाउनमध्ये वेगवेगळया किंमतीचा व प्रकाराचा प्रतिबंधीत गुटख्याचा साठा मिळून आला. त्यात विमल कंपनीचा, आर.एम.डी कंपनीचा, रॉयल जाफ्री अ‍ॅण्ड जर्दा कंपनीचा व इतर कंपनीचे प्रतिबंधीत केलेला गुटख्याचा साठा आहे.

पोलिसांनी सुमारे 9 लाख 19 हजार 460 रूपये किंमतीच्या गुटख्याचा माल जप्त केला असून त्याची माहिती मध्यवर्ती पोलिसांनी अन्न व औषध प्रशासन विभागाला कळवली. या प्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी व्यंकट चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मध्यवर्ती पोलिस ठाण्यात मुर्शित अब्दुल हमीद शेख (22) याच्याविरूध्द गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक एच.बी.काळे करीत आहेत

First Published on: August 15, 2019 1:04 AM
Exit mobile version