कोरोना काळात भूमाफियांकडून ९,५५८ अनधिकृत बांधकामे ; ४६६ वर कारवाई

कोरोना काळात भूमाफियांकडून ९,५५८ अनधिकृत बांधकामे ; ४६६ वर कारवाई

कोरोना काळात भूमाफियांकडून ९,५५८ अनधिकृत बांधकामे ; ४६६ वर कारवाई

मुंबईत मार्च २०२० पासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला. आजही कोरोना नियंत्रणात असला तरी प्रादुर्भाव कायम आहे.पालिका यंत्रणा कोरोनाशी दोन हात करण्यात व्यस्त राहिल्याने दुसरीकडे या संधीचा लाभ उठवून काही भूमाफियांनी गेल्या वर्षभरात अनधिकृत बांधकामे सुसाट वेगाने उभारल्याचे पालिकेनेच माहितीच्या अधिकारात आरटीआय कार्यकर्ता शकील शेख यांना दिलेल्या उत्तरात उघडकीस आले आहे. २५ मार्च २०२० ते २८ फेब्रुवारी २०२१ या कालावधीत मुंबई महापालिकेकडे २४ प्रभागात अनधिकृत बांधकामांबाबत एकूण १३ हजार ३२५ तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी ३ हजार ७६७ तक्रारी या दुबार स्वरूपाच्या असल्याने प्रत्यक्षात अनधिकृत बांधकामांची संख्या ९ हजार ५५८ एवढी आहे. याबाबतची सरासरी काढल्यास दर महिन्याला सरासरी ७९६ तर दररोज २६ अनधिकृत बांधकामे उभारण्यात आल्याचे चित्र समोर येते.

कुर्ला येथे सर्वाधिक २००२ अनधिकृत बांधकामे ; फक्त ५२ प्रकरणात कारवाई

पालिकेने दिलेल्या माहितीनुसार, सर्वाधिक अनधिकृत बांधकामे कुर्ला येथे आहेत. या विभागात अनधिकृत बांधकामांबाबत ३ हजार २५१ तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी १ हजार २४९ तक्रारी दुबार असल्याने अनधिकृत बांधकामांची संख्या २००२ एवढी आहे. मात्र याउलट फक्त ५२ प्रकरणात अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे अत्यंत कासवगतीने अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात येत असल्याचे सांगत शकील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

९,५५८ पैकी केवळ ४६६ अनधिकृत बांधकामांवर कारवाई

मुंबईतील २४ प्रभागात अनधिकृत बांधकामांची संख्या ही ९ हजार ५५८ एवढी असून पालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने त्यापैकी केवळ ४६६ अनधिकृत बांधकामांवर कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आरटीआय कार्यकर्ता शकील यांनी पालिकेच्या या मंदगतीने सुरू असलेल्या कारवाईबाबत संताप व्यक्त केला आहे. एकीकडे कंगना सारख्या अभिनेत्रींच्या अनधिकृत बांधकामांबाबत पालिका जाणीवपूर्वक कारवाई करते व प्रकरण कोर्टात गेल्यास खासगी वकिलांवर लाखो रुपये उधळते. तर मग यक भूमाफियांचा अनधिकृत कामांवर कारवाई करताना पालिकेच्या संबंधित अधिकार्यांच्या हाताला लकवा मारतो का ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

वार्ड               अनधिकृत बांधकामे      कारवाई

ए                       २४                     १
बी                      १८२                    २
सी                     ३८९                    २४
डी                      ७८                    १५
ई                      ४३६                     ०

त्याचप्रमाणे एफ उत्तर वार्डमधील ९० अनधिकृत बांधकामांमधील ९ बांधकामांवर कारवाई झाली आहे. तर एफ उत्तर वॉर्डातील ९० अनधिकृत बांधकामांपैकी फक्त ९ बांधकामांवर कारवाई पालिकेने केली आहे. तर एफ दक्षिणमधील २१४ अनधिकृत बांधकामांपैकी फक्त ३ बांधकामांवर कारवाई झाली आहे. तर जी उत्तरमधील १५० पेैकी फक्त ७, जी दक्षिणमधील १२२ पैकी १५, एच पूर्वमधील २३२ मधील ११, एच पश्चिममधील ४२९ पैकी २१, के/पूर्वमधील ३९५ पैकी ३३ के/पश्चिममधील ३०२ पैकी ५८, एलमधील २००२ पैकी ५२, एम/पूर्वमधील ११७४ पैकी ८, एम/ पश्चिममधील ६८७ पैकी ३३, एन वॉर्मडधील  २४० पैकी ४, पी/ उत्तरमधील  ३४२ पैकी फक्त ६२ तर पी/दक्षिणमधील २३३ मधील ४, आर/उत्तरमधील ५०५ पैकी १४, आर/दक्षिणमधील ३१४ पैकी ७५, तर आर/ मध्यमधील १९६ पैकी ४ एस वॉर्डमधील ५५२ पैकी ८, तर टी वॉर्डमधील २४० पैकी फक्त  ३ अनधिकृत बांधकामांवर कारवाई झाली आहे. अशा मुंबईतील एकूण  ९ लाख ५५८ हजार ४६६ अनधिकृत बांधकामांवर पालिकेने हातोडा फिरवला आहे.


हेही वाचा- डेलकर कुटुंबाला न्याय देऊ; गृहमंत्र्यांचं आश्वासन

 

First Published on: March 9, 2021 8:25 PM
Exit mobile version