घरमुंबईडेलकर कुटुंबाला न्याय देऊ; गृहमंत्र्यांचं आश्वासन

डेलकर कुटुंबाला न्याय देऊ; गृहमंत्र्यांचं आश्वासन

Subscribe

डेलकर कुटुंबीयांनी आमच्या जीविताला धोका असून आम्हाला महाराष्ट्र सरकारने सुरक्षा पुरवावी, अशी मागणीही केली

दादरा-नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांच्या कुटुंबाने आज मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी आम्हाला न्याय द्यावा, अशी मागणी केली गृहमंत्री अनिल देशमुख यांनी डेलकर कुटुंबीयांना या प्रकरणाची सखोल चौकशी करून न्याय देऊ, असं आश्वासन दिलं. दरम्यान, डेलकर कुटुंबीयांनी आमच्या जीविताला धोका असून आम्हाला महाराष्ट्र सरकारने सुरक्षा पुरवावी, अशी मागणी देखील केली. याबाबतची माहिती अनिल देशमुख यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

मोहन डेलकर यांच्या पत्नी कमलाबेन डेलकर, त्यांचा मुलगा आणि मुलगी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि आणि गृहमंत्र्यांना भेटले. महाराष्ट्र पोलिसांनी डेलकर आत्महत्या प्रकरणाची चौकशी केली पाहिजे अशी मागणी डेलकर कुटुंबीयांनी केली. तसंच संरक्षणाची पण मागणी केली आहे, असं अनिल देशमुख यांनी सांगितलं. अनिल देशमुख यांनी डेलकर कुटुंबियांना या प्रकरणाची SIT मार्फत चौकशी सुरू आहे. तुम्हला न्याय मिळेल, असं आश्वासन दिलं.

- Advertisement -

मोहन डेलकर यांनी लिहिलेल्या चिठ्ठीत प्रफुल्ल के पटेल आणि काही अधिकाऱ्यांची नावं घेतली आहेत. मोहन डेलकर दादर नगर हवेलीचे ७ वेळा खासदार होते. त्यांनी २२ फेब्रुवारीला आत्महत्या केली. त्यांनी आत्महत्या करताना सुसाईड नोट लिहिली. त्यामध्ये त्यांनी दादरा नगर हवेलीचे प्रशासक प्रफुल खेडा पटेल यांनी मला त्रास दिला. त्यांच्या त्रासापायी मी आत्महत्या करतोय. त्यांच्याकडून मला प्रचंड त्रास झाला. संसदेत हा प्रश्न उपस्थित केला होता, असं अनिल देशमुख यांनी सांगितलं. त्यांनी आत्महत्या मुंबईमध्ये केली, मी दादर मगर हवेली मध्ये केली असती तर त्याची चौकशी नीट झाली नसती. मला आणि माझ्या कुटुंबियाला न्याय मिळणार नाही. मला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार आणि महाराष्ट्र शासन यांच्यावर विश्वास आहे म्हणून मी मुंबईत आत्महत्या करतोय, असं डेलकर यांनी त्यांच्या सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे, असं देशमुख यांनी सांगितलं.


मोहन डेलकर आत्महत्या प्रकरण: दोषीवर कारवाई करणार – अनिल देशमुख

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -