ठाण्यात युवकाचा तृतीयपंथीशी विवाह

ठाण्यात युवकाचा तृतीयपंथीशी विवाह

तृतीयपंथीयाचे लग्न

सुप्रीम कोर्टाने तृतीयपंथीयांचे हक्क आणि समलैंगिकतेला मान्यता दिली असली तरी समाजातील एक मोठा वर्ग या बाबींकडे सोयीस्कर दुर्लक्ष करताना दिसतो. अनेकदा त्यांच्या स्वातंत्र्यावर गदा आणली जाते. ठाणे शहरात नुकतीच याबाबतीत एक आशादायक घटना घडली आहे. बाळा बनसोडे नावाच्या युवकाने मोनिका नडा नावाच्या तृतीयपंथीसोबत बौद्ध पद्धतीने विवाह केला आहे. ठाण्यातील माजीवडा येथील बुद्ध विहारात नुकताच हा विवाह पार पडला.

मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित

पंढरपूर येथे राहणारा बाळा बनसोडे आणि कर्नाटकमधील मोनिका नडा यांनी हा विवाह केला. भन्ते आयन शिलकीर्ती यांच्या हस्ते हा विवाह पार पडला. समाजाच्या मूळ प्रवाहात तृतीयपंथीयांनाही सामावून घ्यावे, असा संदेश या घटनेमुळे दिला गेला. परिवर्तनाच्या या युगात झालेला हा विवाह समाजाला नवी दिशा दाखवणारा ठरेल, असा विश्वाास भन्ते शिलकीर्ती यांनी यावेळी व्यक्त केला. या विवाहाला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. नवदाम्पत्यांचे त्यांनी भेटवस्तू देऊन अभिनंदन केले.

First Published on: May 22, 2019 7:33 PM
Exit mobile version