डोंगरीतील अनधिकृत बांधकामांवर हातोडा; मार्ग झाला अतिक्रमणमुक्त

डोंगरीतील अनधिकृत बांधकामांवर हातोडा; मार्ग झाला अतिक्रमणमुक्त

डोंगरीतील अनधिकृत बांधकामांवर हातोडा

डोंगरीतील सरदार वल्लभभाई पटेल मार्गालगत आणि खोजा कब्रस्तानालगत असणाऱ्या रस्ता आणि पदपथावर गेल्या काही वर्षात मोठ्याप्रमाणात अनधिकृत बांधकाम उभी होती. यासर्व बांधकामांवर महापालिकेच्या बी विभागाच्या सहायक आयुक्त नितिन आर्ते यांच्या नेतृत्वाखाली धडक कारवाई करून येथील सर्व सामान जप्त करण्यात आले आहे. तब्बल चार ट्रक भरेल एवढा साठा जप्त करण्यात आला आहे.

तब्बल ४० अनधिकृत बांधकामांवर कारवाई

दक्षिण मुंबईतील ‘डोंगरी’ परिसर आणि त्या लगतच्या परिसरात ‘परिमंडळ एक’ चे उपायुक्त हर्षद काळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मुंबई पोलिसांच्या सहकार्याने सोमवारी धडक कारवाई हाती घेऊन ४० अतिक्रमणांसह अनधिकृत बांधकाम जमिनदोस्त करण्यात आली. व्यावसायिक स्वरुपाचा वापर असलेल्या या ठिकाणी गाद्या, खुर्च्या, टेबल, कपाट इत्यादी बाबींचा ४ ट्रक भरेल एवढा साठा आढळून आला. जो तात्काळ जप्त करण्यात आला आहे. ही अनधिकृत बांधकामे हटविल्यामुळे सरदार वल्लभभाई पटेल मार्गासह लगतच्या परिसरातील पादचाऱ्यांना पदपथावरुन चालणे अधिक सुलभ झाले आहे. तसेच या रस्त्यावरील वाहतूक अधिक सुलभ आणि सुरळीत होण्यास मदत होईल, असाही विश्वास नितीन आर्ते यांनी व्यक्त केला.


हेही वाचा – मोडकळीस आलेल्या इमारतींचा पुर्नविकास रखडला; आर्थिक मंदीचा पुनर्विकासाला फटका


 

First Published on: February 25, 2020 10:24 PM
Exit mobile version