केतकीने काढलेल्या टॅटूचा थेट संबंध शरद पवारांशी; पोस्ट शेअर करत म्हणाली…

केतकीने काढलेल्या टॅटूचा थेट संबंध शरद पवारांशी; पोस्ट शेअर करत म्हणाली…

मराठी अभिनेत्री केतकी चितळे नेहमी आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे आणि कृतीमुळे चर्चेत असते. यात अलीकडे ती राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबद्दल केलेल्या एका पोस्टमुळे चांगलीच चर्चेत आली होती. इतकंच नाही तर अभिनेत्री केतकी चितळेला यामुळे तुरुंगवासही भोगावा लागला होता. मात्र वादग्रस्त पोस्ट किंवा वक्तव्यामुळे अडचणीत सापडण्याची केतकीची ही पहिलीच वेळ नव्हती. यापूर्वी देखील अनेकदा केतकी चर्चेत आली आहे. नुकतंच केतकीने नववर्षीनिमित्त एक व्हिडिओ शेअर केला आहे. मात्र या व्हिडिओमधील तिच्या हातावर असलेल्या टॅटूने सर्वांचे लक्ष वेधले आहे. 186/22 अश्या नंबरचा हा टॅटू आहे. मात्र या टॅटूमागचा नेमका संदर्भ हा थेट शरद पवारांशी असल्याचं दिसून येत आहे. मात्र नेमकं केतकी काय म्हणाली जाणून घेऊ.

नववर्षानिमित्त केतकीने सोशल मीडियावर शुभेच्छांचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये ती 186-22 असा टॅटू दाखवत, माफ करा पण कधीही विसरू नका…. हॅप्पी न्यू इयर असं म्हणत दारू पिताना दिसतेय. या व्हिडीओसह तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, “मैं कट्टर सनातन हिन्दू हूँ लेकिन इसका मतलब यह नहीं की बाकी सब १००% गलत है।”

यावर एका नेटकऱ्याने तिला टॅटूचा अर्थ विचारला आहे. “हा टॅटू म्हणजे माझा अंडरट्रायल कैदी नंबर आहे. ते अंक कैदी नंबरचे आहेत. मी कोणालाही माफ करु शकते. पण विसरु शकत नाही”, असे तिने त्या नेटकऱ्याला उत्तर देताना म्हटले आहे.

नेमकं केतकीच्या टॅटूचा संबध शरद पवारांशी का जोडला जातोय?

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत केतकीने एक पोस्ट तिच्या पेजवर शेअर केली होती. या पोस्टमध्ये केतकीने जरी शरद पवारांचे नाव घेतले नव्हते मात्र केतकीने शरद पवार यांचे वय आणि पवार असा उल्लेख करत पोस्ट शेअर केली होती. यामुळे केतकीला 41 दिवस तुरुंगवास भोगावा लागला होता.

त्याचवेळी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आपण केतकी चितळे यांना ओळखत नसून या पदाबाबत काहीही माहिती नसल्याचे सांगितले. पवार पुढे म्हणाले की, जोपर्यंत ते स्वतः पोस्ट पाहत नाहीत, तोपर्यंत या प्रकरणी काहीही बोलू शकत नाही. दरम्यान, मराठी अभिनेत्रींविरोधात राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आघाडी उघडली आहे.


नाशिकच्या जिंदाल कंपनीत बॉयलरचा भीषण स्फोट; अनेक कर्मचारी जखमी

First Published on: January 1, 2023 4:08 PM
Exit mobile version