घरमहाराष्ट्रनाशिकनाशिकच्या जिंदाल कंपनीत बॉयलरचा भीषण स्फोट; अनेक कर्मचारी जखमी

नाशिकच्या जिंदाल कंपनीत बॉयलरचा भीषण स्फोट; अनेक कर्मचारी जखमी

Subscribe

नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच नाशिकमधून भीषण आगीची घटना समोर आली आहे. नाशिकच्या इगतपुरी मुंढेगावाजवळ असलेल्या जिंदाल कंपनीत बॉयलरचा  स्फोट झाला. आज सकाळच्या सुमारास ही घटना घडली. जिंदाल ग्रुपची पोलिफिल्मची निर्मिती करणाऱ्या या कंपनीत आधी स्फोट झाला, या स्फोटामुळे नंतर आग लागली. या आगीत कंपनीतील काही कर्मचारी गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळतेय, तर काही कर्मचारी हे आत अडकल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

या आगीचे लोण दूरवर दिसत असून नाशिक ग्रामीण अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत. या जवानांकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. या आगीच्या घटनेनंतर काही किलोमीटरपर्यंतचा परिसरत सीझ केला आहे. तर आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना सुरक्षित स्थळी नेले जात आहे. मात्र ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप समोर आले नाही.

- Advertisement -

या घटनेत 11 कर्मचारी जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे. अडकलेल्या कर्मचाऱ्यांना वाचवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. प्रशासनाकडून सर्वतोपरी मदत केली जात आहे. या घटनेत अडकलेल्या नागरिकांना रेस्क्यू करण्यासाठी हेलिकॉप्टर पाठवले आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.


पंतप्रधान मोदी, राष्ट्रपती मुर्मू यांच्यासह ‘या’ राजकीय दिग्गजांकडून देशवासीयांना नवं वर्षाच्या शुभेच्छा

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -