सिंहालाही घडवला वनवास ! अखेर ‘बब्बर शेर’ आझाद

सिंहालाही घडवला वनवास ! अखेर ‘बब्बर शेर’ आझाद

After 13 years of captivity, the lion got freedom

गुलामगिरीत किंवा बंदिवासात जीवन जगण्यापेक्षा वाईट काहीच नाही. मग तो माणूस असो वा प्राणी, स्वातंत्र्य हे सर्वांसाठीच महत्वाचे आहे. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे, ज्यात तब्बल १३ वर्षांच्या बंदिवासानंतर प्रथमच एक सिंह सर्कसच्या पिंजऱ्यातून स्वतंत्र झाला आहे. पिंजऱ्यातून बाहेर येऊन सिंह हिरव्यागार शेतात स्वातंत्र्याचा मनसोक्त आनंद घेत आहे. ईकडे तिकडे मातीत तो वावरत आहे. हे पाहून नेटकरीही भावूक झाले आहेत.

आयएफएस अधिकारी सुशांत नंदा यांनी ट्विटरवर हा २७ सेकंदाचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले आहे, “सर्कसमधून सोडल्यानंतर १३ वर्षानंतर प्रथमच मातीची भावना समजणार्‍या सिंहाचा आत्मा.” व्हिडिओमध्ये सिंह आपल्या पंजाला चिखलात घासतो आहे आणि शेवटी मुक्त झाल्याचा स्वातंत्र्याचा आनंद घेत आहे. आपल्या आयुष्याचा बहुतांश काळ हा त्याने पिजंऱ्यात घालवला आहे. त्यामुळे बाहेरचे विश्व त्यासाठी नवीन असल्यासारखे तो सर्वत्र वावरत आहे.

व्हिडिओ पाहून नेटकरी भावूक

यावर नेटकरी भावूक होऊन मोठ्याप्रमाणावर प्रतिक्रिया देत आहेत. एका व्यक्तीने लिहिले आहे की, विकास ही गोष्ट का खराब आहे याचे माणूस स्वत:च एक उत्तम उदाहरण आहे. हे या व्हिडिओवरून कळते, तर दुसरा व्यक्ती म्हणतो की, त्याचा आनंद बघा फक्त. आणखी एका व्यक्तीने लिहीले आहे, की सर्कस सारखे प्रकार फार चूकीचे आहेत. पैशासाठी माणूस फार स्वार्थी झाला आहे. अशाप्रकारच्या अनेक प्रतिक्रिया नेटकरी देत आहेत.

First Published on: February 24, 2020 12:06 PM
Exit mobile version