दादरच्या शिवाजी पार्कचे नामकरण…छत्रपती शिवाजी महाराज पार्क

दादरच्या शिवाजी पार्कचे नामकरण…छत्रपती शिवाजी महाराज पार्क

दादर मधील शिवाजी पार्कचं नाव बदललं

दादर मधील शिवाजी पार्क मैदानाच नाव बदललं आहे. आता शिवाजी पार्क नाव नसून छत्रपती शिवाजी महाराज पार्क असं नवं नाव देण्यात आलं आहे. तब्बल ९३ वर्षांनंतर शिवाजी पार्कच नाव बदलण्यात आलं आहे. मुंबई महापालिकेने शिवाजी पार्कच्या नामांतरणाचा निर्णय घेतला आहे. याबाबतचा ठराव बुधवारी महापालिका सभागृहात करण्यात आला असून त्याबाबतचे नामफलक या मैदानावर झळकणार आहे. त्यामुळे आता छत्रपती शिवाजी महाराज पार्क असा उल्लेख करावा लागणार आहे. १९२५ साली मुंबई महापालिकेनं शिवाजी पार्क मैदान जनतेसाठी खुलं करण्यात आलं होतं. या मैदानावर १९६६ साली शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला. पहिल्यांदा शिवाजी पार्कचं मूळ नाव माहिम पार्क होत.

आता या शिवाजी पार्क मैदानावर अनेक राजकीय कार्यक्रम असतात. तसंच या मैदानावर भारतरत्न सचिन तेंडूलकर घडला आहे. त्यामुळे हे मैदान लोकप्रिय स्थळ आहे. शिवसेना शिवाजी पार्कला शिवतीर्थ असं संबोधत आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून शिवसेना शिवाजी पार्कचं नाव शिवतीर्थ करण्यासाठी मागणी करत आहे. मात्र आता शिवाजी पार्कच नाव बदलून छत्रपती शिवाजी महाराज पार्क असं नावं महापालिकेन बदललं आहे. यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचं नाव देखील बदललं होत.

बाळासाहेब ठाकरे यांनी सलग ४० वर्षे शिवाजीपार्कचे मैदान राजकीय सभा घेत

दादर येथील शिवाजीपार्क मैदान सर्वपरिचित असून संयुक्त महाराष्ट्र लढ्यापासून ते अनेक राजकीय पक्षांच्या जडणघडणीत हे मैदान साक्षीदार राहिलेले आहे. शिवसेना पक्षप्रमुख प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सलग ४० वर्षे शिवाजीपार्कचे मैदान राजकीय सभा घेत हे मैदान मारुन नेले होते. त्यामुळे शिवसैनिक या मैदानाला शिवतीर्थ असे संबोधतात. सात वर्षांपूर्वी या मैदानाचे नामकरण शिवतीर्थ करण्याचा प्रयत्न शिवसेनेने केला होता आणि तत्कालिन स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे यांनी याचे नामकरण शिवतीर्थ करण्याची ठरावाच्या सूचनेद्दवारे मागणी केली होती. परंतु खुद्द बाळासाहेबांनी या मैदानाच्या नाव शिवाजीपार्कच राहिल, असे सांगितले. त्यानंतर शेवाळे यांना अनुपस्थित ठेवत यावर शिवसेनेने पडदा पाडण्याचा प्रयत्न केला.

छत्रपती शिवाजी महाराज असे पूर्ण उल्लेख केला जावा यासाठी

परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख एकेरी होत असल्याने याबाबत अनेक संस्था आणि व्यक्तींकडून आक्षेप नोंदवत सुचनाही केल्या होत्या. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज असे पूर्ण उल्लेख केला जावा यासाठी शिवाजीपार्क मैदानाच्या नामकरणात बदल करण्याचा निर्णय घेतला. १९२७ मध्ये या मैदानाचे नामकरण शिवाजीपार्क असे करण्यात आले होते. या ठरावाचा फेरविचार करत त्यामध्ये हे नामकरण छत्रपती शिवाजी महाराज मैदान करण्याची सूचना स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव केली. त्यानुसार हा ठराव मंजूर करण्यात आला आहे. महापालिका सभागृहात हा ठराव करण्यात आला असल्याने आता या मैदानाचे नामकरण छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असे करण्यात आले आहे.


हेही वाचा – १३ वर्षांनंतर भारत-पाकिस्तान सामना; आज टेनिस क्रिकेट सामना रंगणार


 

First Published on: March 11, 2020 6:34 PM
Exit mobile version