गुगलची नोकरी सोडून समोसे विकले आणि कमवले ५० लाख

गुगलची नोकरी सोडून समोसे विकले आणि कमवले ५० लाख

समोसा विकून ५० लाखाहूनही अधिक उत्तपन्न

एका सामान्य व्यक्तीची इच्छा म्हणजे, एक चांगली नोकरी आणि सुखी कुटुंब एवढीच असते. जर एखादा व्यक्ती गुगलसारख्या कंपनीची नोकरी सोडून सामोसे विकण्याचा निर्णय घेत असेल तर त्याला तुम्ही वेड्यातच काढाल. पण त्या व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न ऐकून सगळेच त्याचे कौतुक करतील. ‘मुनाफ कपाडिया’ असे या व्यक्तीचे नाव असून गुगलमधली नोकरी सोडून समोसे विकण्याचा निर्णय त्याने घेतला. समोसे विकता विकता तो व्यक्ती आज ५० लाखांहून अधिकच्या संपत्तीचा मालक देखील झाला आहे. त्याच्या फेसबुक प्रोफाईलमध्ये देखील त्याने गुगलची नोकरी सोडून समोस विकण्याचा निर्णय घेतला आहे, असे लिहिले आहे. मुनाफचे समोसे कोणत्याही रस्त्यावर खाल्ले जात नाही तर त्याचे समोसे मुंबईच्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये खाल्ले जातात. एवढेच नाही तर बॉलिवूडमध्ये देखील त्याचे समोसे खूप प्रसिद्ध आहेत.

मुनाफने केलं एमबीए

मुनाफने एमबीएची पदवी मिळवली असून, सुरवातीला अनेक कंपन्यांमध्ये काम केल्यानंतर त्यांने नोकरीसाठी परदेशात जाण्याचा निर्णय घेतला होता. त्याला गुगलमध्ये नोकरी देखील मिळाली. अनेक वर्ष गुगलमध्ये काम केल्यानंतर मुनाफला व्यवसाय करण्याची इच्छा झाली, त्याची ही इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याने गुगलची नोकरी सोडली आणि तो भारतात परतला. भारतात परतल्यानंतर त्याच्या आईच्या मदतीने त्याने समोसे विकायला सुरवात केली. त्याचसोबत आईने बनवलेले वेगवेगळे खाद्यपदार्थ देखील त्याने ग्राहकांना दिले.

देशभरात उघडल्या शाखा

“मुनाफ दी बोहरी किचन” असे हॉटेल देखील त्याने सुरु केले. या हॉटेलच्या शाखा मुंबईतच नव्हे तर संपूर्ण देशभरात आहेत. त्याने हे हॉटेल सुरु कराण्यासाठी वर्षभराचा कालावधी घेतला. या वर्षभरात त्याच्या व्यवसायाला ५० लाखांहून अधिक नफा झाला आहे. मुनाफ यांच्या हॉटेलमध्ये मटण समोसा, नरगिस कबाब, डब्बा गोश्त आणि कडी भात हे पदार्थ मिळतात. त्यांच्या हॉटेलमध्ये खिमा समोसाही बनवला जातो, ज्याची मागणी जास्त प्रमाणात आहे. आशुतोष गोवारीकर, फराह खान या सेलिब्रीटीजनी ‘मुनाफ दी बोहरी किचन’ची चव घेतली तेव्हा त्याचे कौतुतही सोशल मीडियावर केली आहे.

First Published on: February 12, 2019 8:23 PM
Exit mobile version