अक्षयची ‘ही’ सवय त्याच्या मुलाला, पत्नीला आवडत नाही

अक्षयची ‘ही’ सवय त्याच्या मुलाला, पत्नीला आवडत नाही

अक्षय कुमार आणि कुटूंबिय

बॉलिवूडचा खिलाडी अक्षकुमार नुकतीच लंडनमध्ये झालेल्या स्टार स्पोर्ट्स फिलिप्स हू क्रिकेट लाइव्हमध्ये हजेरी लावली. यावेळी अक्षयने दिलखुलास गप्पा मारताना कुटुंबिय आणि त्याच्या क्रिकेटप्रेमावर प्रकाश टाकला. अक्षयकुमारला लहानपणापासून क्रिकेटची आवड असून या कार्यक्रमात अक्षयने त्याच्या शालेय जीवनातील क्रिकेट खेळातील सहभागाविषयी गंमतीदार किस्सा सांगितला.

मुलांच्या क्रिकेटप्रेमाविषयी अक्षय म्हणतो…

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार याला क्रिकेटचे खूप वेड आहे. आपल्या बिझी शेड्यूलमधून वेळ काढून अक्षय कुमार क्रिकेटचे सामनेसुद्धा पाहतो. मात्र त्याची पत्नी ट्विंकलला त्याची ही सवय आवडत नाही. ट्विंकलप्रमाणेच अक्षयचा मुलगा आरवलासुद्धा क्रिकेट आवडत नसल्याचे अक्षयने सांगितले. आरवला क्रिकेट न आवडण्यामागचं कारणंही अक्षयने सांगितलं. अक्षय वेळात वेळ काढून क्रिकेटचे सामने पाहतो. वडिलांची ही सवय आरवला आवडत नाही त्यामुळे आरव क्रिकेटचा द्वेष करत असल्याचे अक्षय म्हणाला. याबाबत त्याची कन्या नितारा मात्र त्याच्यासारखीच असल्याचे तिच्या क्रिकेटप्रेमावरून दिसून येते. अक्षयने सांगितले की, आरवला जरी क्रिकेट आवडत नसले तरी माझी कन्या नितारा माझ्याबरोबर क्रिकेटचे सामने पाहते. त्यामुळे तिलाही क्रिकेटची आवड निर्माण झाली आहे.

शाळेतील क्रिकेट संघातील निवडीबद्दल

स्टार स्पोर्ट्स फिलिप्स हू क्रिकेट लाइव्ह या कार्यक्रमात अक्षय कुमार त्याच्या शालेय जीवनातील क्रिकेट खेळाबद्दल भरभरून बोलला. तो म्हणाला की, शालेय जीवनात मी भरपूर क्रिकेट खेळलो आहे. तुम्हाला सांगतो अनेकदा उत्तम फलंदाजी आणि गोलंदाजांची संघात निवड होते. पण क्रिकेट संघात माझी निवड क्षेत्ररक्षणासाठी होत असे. मी उत्तम पळून चौकार अडवेन, याच एका उद्देशाने माझी संघात निवड होत, असे अक्षय कुमार यांनी सांगितले.

First Published on: July 15, 2019 9:25 PM
Exit mobile version