रुग्णांसाठी लोकल प्रवासाची परवानगी द्या; आमदार हितेंद्र ठाकूर यांची मागणी

रुग्णांसाठी लोकल प्रवासाची परवानगी द्या; आमदार हितेंद्र ठाकूर यांची मागणी

Local update : प्रवाशांनो कृपया लक्ष द्या! रविवारी ठाणे ते दिवादरम्यान मध्य रेल्वेच्या धीमी लोकल सेवा १८ तास बंद

राज्यात अनलॉक प्रक्रिया सुरु असून मुंबईतील लोकल ट्रेन्स सुरु करण्यात आल्या आहेत. या ट्रेन्समधून अत्यावश्यक सेवेसाठीच्या कर्मचार्‍यांना प्रवास करण्याची मुभा आहे. दरम्यान, आता हृदयरोग, कॅन्सर, किडनी सारख्या गंभीर व्याधीने त्रस्त असलेल्या रुग्णांना मुंबईतील हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्यास जाण्यासाठी लोकल ट्रेनच्या प्रवासाची परवानगी द्यावी, अशी मागणी आमदार हितेंद्र ठाकूर आणि आमदार क्षितीज ठाकूर यांनी पंतप्रधान आणि रेल्वे मंत्र्यांकडे केली आहे.

वसई-विरार परिसरातील हदयरोग, कॅन्सर, किडनी या गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांची मुंबईतील केईएम, जेजे, टाटा, नायर, भगवती या सरकारी तसेच काही खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. पण, कोरोनामुळे सार्वजनिक परिवहन सेवा बंद असल्याने शेकडो रुग्णांना उपचार मिळत नाहीत. त्यामुळे ते त्रस्त झाले आहेत. आमदार हितेंद्र ठाकूर यांनी यातील बर्‍याच रुग्णांना स्थानिक हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय सेवा मिळवून दिली आहे.
दरम्यान, सध्या अनलॉकडाऊन सुरु करुन सरकारने लोकल सेवा सुरु केली असून त्यात अत्यावश्यक सेवेसाठीच्या कर्मचार्‍यांना प्रवासाची मुभा दिली आहे. त्या लोकलमध्ये गंभीर व्याधीने त्रस्त असलेल्या रुग्णांना मुंबईत उपचार घेण्यासाठी जाण्याची परवानगी द्यावी अशी ठाकूरांची मागणी आहे. एमएमआर विभागात असे हजारो रुग्ण असून त्यांना या सेवेचा लाभ होणार आहे.


हेही वाचा – तत्कालीन फडणवीस सरकारची आणखी एक योजना ठाकरे सरकारकडून रद्द


 

First Published on: July 31, 2020 8:23 PM
Exit mobile version