Ambani Scorpio scare : NIA ला मुंबईवर भरवसा नाय ! पुणे फॉरेन्सिक टीम मुंबईत दाखल

Ambani Scorpio scare : NIA ला मुंबईवर भरवसा नाय ! पुणे फॉरेन्सिक टीम मुंबईत दाखल

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांसह सापडलेल्या स्कॉर्पिओच्या प्रकरणात नॅशनल इनवेस्टिगेशन एजन्सी (NIA) च्या टीमकडून तपास सुरू आहे. एनआयएच्या टीमकडून आता या संपुर्ण प्रकरणात पुण्याच्या फॉरेन्स टीमला बोलावण्यात आले होते. त्यानुसार शुक्रवारी केंद्रीय न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळा पुणे यांचे पथक दुपारी मुंबईतील एनआयएच्या कार्यालयात दाखल झाले. या पथकाकडून मुकेश अंबानी स्फोटके प्रकरणात ताब्यात घेण्यात आलेल्या इनोव्हा तसेच इतर वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. केंद्राच्या अखत्यारीतील पुण्याची फॉरेन्सिक टीम आज शुक्रवारी दुपारपासूनच या संपुर्ण प्रकरणात गाड्यांचा झालेला एंगल आणि त्याच्याशी संबंधित पुरावे शोधत आहे. (Ambani Scorpio scare, Pune forensic team visits mumbai NIA office)

फॉरेन्सिकची टीम नेमक काय करत आहे ?

या संपुर्ण प्रकरणात वापरण्यात आलेल्या गाड्यांच्या हाताचे ठसे आणि इतर पुरावे मिळतात का हे याची तपासणी सुरू आहे. मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सीसीटीव्हीत दिसलेल्या इनोव्हाचाही तपास यामध्ये सुरू आहे. स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओसोबतच ही इनोव्हा घटनेच्या दिवशी फिरत असल्याचे आढळले आहे. ही इनोव्हा पोलीस आयुक्तालयातून वाझेंच्या अटकेनंतर एनआयएने ताब्यात घेतली होती. फॉरेन्सिक टीमकडून केल्या जात असलेल्या संपूर्ण तपासणीचे व्हिडिओ रेकॉर्डिंगही केले जात आहे. इनोव्हानंतर फॉरेन्सिक टीम इतर गाड्यांची तपासणी करणार आहेत असे कळते. फॉरेन्सिक टीमकडून या संपुर्ण गाड्यांची सध्या तपासणी सुरू आहे.

फॉरेन्सिक टीमही केंद्राचीच

केंद्रीय तपास यंत्रणा म्हणजे एनआयएने या संपुर्ण प्रकरणात सचिन वाझेंच्या आतापर्यंतच्या सर्व वक्तव्यावर विश्वास ठेवलेला नाही असेच चित्र आहे. सचिन वाझे यांना वरिष्ठांचा आशीर्वाद होता का ? याची उकल करण्यासाठीच एनआयएचे महासंचालक वाय सी मोदी सध्या मुंबईत तळ ठोकून आहेत. तर आज शुक्रवारी मुंबईत आलेल्या फॉरेन्सिक टीमच्या मदतीसाठीही मुंबईत्या राज्य सरकारच्या फॉरेन्सिक टीमएवजी एनआयएने केंद्राच्या अखत्यारीतील पुण्याच्या फॉरेन्सिक टीमची मदत घेतली आहे. एकुणच या प्रकरणात केंद्राची टीम राज्य सरकारच्या कोणत्याच यंत्रणेवर विश्वास ठेवायला तयार नाही, असेच चित्र आहे.


 

First Published on: March 19, 2021 5:43 PM
Exit mobile version