अंधेरीत कमर्शिअल बिल्डींगला आग, जीवितहानी नाही

अंधेरीत कमर्शिअल बिल्डींगला आग, जीवितहानी नाही

सौजन्य- ANI

मुंबईच्या अंधेरी उपनगरातील एस्टॉन या १६ मजली कमर्शिअल इमारतीमध्ये शुक्रवारी मध्यरात्री आग लागल्याची घटना घडली. ही इमारत अंधेरीच्या लोखंडवाला परिसरात असलेल्या Infinity मॉलजवळ आहे. सदर इमारतीच्या पाचव्या आणि सहाव्या मजल्यावर ही आग लागल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान आग लागल्याची खबर मिळताच अग्निशामन दलाच्या ६ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरु केले. मध्यरात्री ३.३० च्या सुमारास आग विझवण्यात अग्निशामन दलाला यश आले. मध्यरात्री ही आग लागल्यामुळे कॉम्प्लेक्समध्ये लोकांचा वावर नव्हता. यामुळे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. दरम्यान ही आग नेमकी कशामुळे लागली? याचा तपास सुरु असल्याची माहिती मिळत आहे.

वाचा: पोलीस बनले ‘वसुली एजंट’

First Published on: October 6, 2018 9:37 AM
Exit mobile version