लोखंडवाला कॉम्प्लेक्समध्ये मध्यरात्री आगडोंब ; १० जण जखमी

लोखंडवाला कॉम्प्लेक्समध्ये मध्यरात्री आगडोंब ; १० जण जखमी

मुंबई  -: अंधेरी (पश्चिम) येथील प्रसिद्ध लोखंडवाला काॅम्प्लेक्समधील शिवशक्ती भवन या इमारतीमध्ये बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास २४ व्या मजल्यावर भीषण आग लागली. या भीषण आगीचा धूर नाकातोंडात गेल्यामुळे १० जणांना धुराची बाधा झाली. त्यामुळे त्यांना तात्काळ नजीकच्या रूग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते. तर अनेकजणांनी वेळीच सतर्कता दाखवल्याने त्यांचे प्राण वाचले.

प्राप्त माहितीनुसार, अंधेरी (पश्चिम) येथील लोखंडवाला काॅम्प्लेक्समधील शिवशक्ती भवन या २८ मजली इमारतीमध्ये बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास रहिवाशी गाढ झोपेत असताना २४ व्या मजल्यावर बुधवारी मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास अचानकपणे आग लागली. प्राथमिक माहितीनुसार, ही आग केबल वायरला लागली होती. काही अवधीतच ही आग भडकली व इमारतीमधील २३ व्या मजल्यापर्यंत पसरली. या आगीची माहिती मिळताच इमारतीमधील रहिवाशी झोपेतून खडबडून जागे झाले. या आगीमुळे इमारतीमध्ये व संपूर्ण लोखंडवाला कॉम्प्लेक्समध्ये खळबळ उडाली होती.

इमारतीमध्ये आगीचा धूर पसरला होता. रहिवाशांनी जीव वाचविण्यासाठी तात्काळ आपल्या नातेवाईकांसह इमारतीबाहेर धाव घेतली. मात्र या आगीचा धूर नाकातोंडात गेल्यामुळे गुदमरायला झाल्याने त्यांना तात्काळ नजीकच्या नानावटी व कोकिळाबेन रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते.
दरम्यान, या भीषण आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन अथक प्रयत्नांनी पहाटे पाच वाजताच्या सुमारास या आगीवर फायर इंजिन व वॉटर टॅंकर यांच्या साहाय्याने नियंत्रण मिळविले व आग विझविली.

आगीमुळे जखमी झालेल्यांची नावे -:

कोकिळाबेन रुग्णालयात दाखल जखमींची नावे -:

(१) चितवान कौशल (३४)
(२) अभिषेक सिंग दुहान (३९)
(३) चंद्रमोहिनी कौशल ( ७५ / महिला)
(४) शिरीन मोतीवाला (८५/ महिला)

नानावटी रुग्णालयात दाखल जखमींची नावे -:

(१)चंद्रकांत विथलानी (७१)
(२) किरण विथलानी (७०/ महिला)
(३)लिसा अदिया (४४/ महिला)
(४)सपना सेहजाब (२२/महिला)
(५) हयादी विथलानी (३४ / महिला)
(६) कैलास विथलानी (४०)


DGCA कडून नियमात मोठा बदल; तिकीट श्रेणी बदलल्यास विमान कंपनीला द्यावे लागणार पैसे परत

First Published on: January 25, 2023 10:02 PM
Exit mobile version