सावधान: बँकेत नोकरीच्या शोधात आहात का? मग हे नक्की वाचा

सावधान: बँकेत नोकरीच्या शोधात आहात का? मग हे नक्की वाचा

राज्यात नोकरीला लावण्याच्या आमिषापायी अनेक जणांचा बळी गेला आहे. तर अनेक लोकांची फसवणूक झाल्याच्या घटना रोज घडत आहेत. कोरोना संकटानंतर प्रचंड तरुन बेरोजगार झाले आहेत. त्यामुळे अनेकांनी नोकरी लावण्याच्या कारणावरुन फसवणूकीचा जोडधंदा सुरु केला आहे. तरुणांना नोकरी लावून देतो असे सांगून सऱ्हास पैसा वसूल केला जात आहे. त्यात बँकेत नोकरी मिळवण्यासाठी अनेकांची फसवणूकही केली असल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. याबाबत स्टेट बँक ऑफ इंडियाने तरुणांसाठी महत्त्वाच्या सूचना जाही करत सतर्कतेचा इशारा दिला आहे. एसबीआयने म्हटले आहे की, नोकरी शोधणाऱ्यांसाठी इंटरनेट स्कॅमर्सनं भरलेले आहे. त्यामुळे समोरुन येणाऱ्या खोट्या जॉबच्या ऑफर टाळा. तुम्हाला कोणाचा फोन आला तर त्याला आपली वैयक्तिक माहिती देऊ नका असे स्टेट बँक ऑफ इंडियाने म्हटले आहे. तसेच तुमची फसवणूक झाल्यास Https://cybercrime.gov.in वर सायबर क्राईम नोंदवायला अशी माहिती ट्विट करत एसबीआयने दिली आहे.

एसबीआयने असेही सांगितले आहे की, तात्काळ कर्ज उपलब्ध करुन देणाऱ्या अॅप सांभाळून वापरा. अॅपमध्ये कोणत्याही माहितीवर क्लिक करु नका जेणेकरुन तुमचे आर्थिक नुकसान होईल. तात्काळ कर्ज घेण्यापूर्वी संबंधित कंपनीबाबत अधिकची माहिती मिळवा आणि कर्जाची मागणी करण्याच्या सुचनाही एसबीआयकडून देण्यात आल्या आहेत. तर काही मोबाईल लॅंडिग अॅप्सचाही काळजीने वापर करण्यास सांगितले आहे. आरबीआयकडून अनेक अॅपवर कारवाई केली जात आहे.

एसबीआयने दिलेल्या काही मर्गदर्शक सूचना

नोकरीबाबत कोणी ऑफर दिली तर त्याची योग्य ती पडताळणी करा
नोकरी देणाऱ्या कंपनीची माहिती मिळवा
नोकरी देणाऱ्या व्यक्तीकडे आपली वैयक्तिक माहिती किंवा दस्तावेज देऊ नका
ऑनलाईन लिंकवर माहिती देताना काळजी घ्या
नोकरी देण्यासाठी कोणतीही कंपनी आणि अधिकारी उमेदवारांकडून आगाऊ पैसे घेत नाही

First Published on: February 15, 2021 10:52 AM
Exit mobile version