12 आमदारांचे सदस्यत्व रद्द करा, अरविंद सावतांच्या शिष्टमंडळाची विधानसभा उपाध्यक्षांकडे मागणी

अरवींद सावत यांनी शिष्टमंडळासह विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह 12 आमदारांचे सदस्यत्व रद्द करावे अशी मागणी विधीमंडळ उपाध्यक्षांकडे केल्याचे सांगितले. ते बंडखोर आमदार पक्षाच्या विधीमंडळ बैठकीला गैरहजर राहील्यामुळे ही कारवाई करावी, अशी पीटीशन दाखल केल्याची मागणी अरविंद सावंत यांनी केली आहे.

सदस्यत्व रद्द करण्याची मागणी झालेले 12 आमदार –

एकनाथ शिंदे (कोपरी)

तानाजी सावंत (भूम-परंडा)

संदीपान भुमरे (औरंगाबाद शहर)

संजय शिरसाठ (औरंगाबाद पश्चिम)

अब्दुल सत्तार (सिल्लोड)

भरत गोगावले (महाड)

प्रकाश सुर्वे (मागाठाणे)

अनिल बाबर (सांगली)

बालाजी किनीकर (अंबरनाथ)

यामिनी जाधव (भायखळा)

लता सोनावणे (चोपडा)

महेश शिंदे (कोरेगाव)

12 आमदारांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी का केली –

एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुवाहाटीमध्ये सध्या शिवसेनेचे 42 आमदार आहेत. मग शिवसेनेकडून केवळ 12 आमदारांवर कारवाई करण्याचीच मागणी का करण्यात आली? असा सवाल आता विचारला जातो आहे. त्यात एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारले आहे. तर संजय शिरसाठ यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून आमदारांची नाराजी व्यक्त केली होती. तर उर्वरित आमदार विविध प्रकरणात वादात आहेत. किंवा त्यांनी शिवसेनेत अनेकदा उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे 42 पैकी या ठराविक आमदारांचेच सदस्यत्व रद्द करण्याची मागणी शिवसेनेकडून करण्यात आलीय.

First Published on: June 23, 2022 10:05 PM
Exit mobile version