Aryan Khan – आर्यनला तीन दिवसात जामिन मिळाला नाही तर १५ नोव्हेंबरपर्यंत राहावे लागेल तुरुंगात

Aryan Khan – आर्यनला तीन दिवसात जामिन मिळाला नाही तर १५ नोव्हेंबरपर्यंत राहावे लागेल तुरुंगात

सुपरस्टार शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खानच्या जामिनावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. कुठल्याही क्षणी न्यायालयाचा निर्णय येऊ शकतो पण असे असले तरी आर्यनला य़ा तीन दिवसात जामिन मिळणे आवश्यक आहे. नाहीतर आर्यनचा जेलमधील मुक्काम १५ नोव्हेंबरपर्यंत वाढणार आहे.

मुंबई उच्च न्यायालयाला १ नोव्हेंबर पासून दिवाळी सुट्टी सुरू होत आहे. १ ते ६ नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कामकाज बंद राहणार आहे. तसेच १ ते १२ नोव्हेंबरपर्यंत न्यायालय बंद राहणार आहे. १३-१४ नोव्हेंबरला न्यायालयाला शनिवार -रविवारची सुट्टी आहे. २९ ऑक्टोबरपर्यंत न्यायालय सुरू आहे. त्यानंतर न्यायालय थेट १५ नोव्हेंबरला सुरू होणार आहे.

आर्यन खान गेल्या २५ दिवसांपासून तुरुंगात आहे. आर्यनला आधी एनसीबीच्या कोठडीत ठेवण्यात आले होते. नंतर त्याला न्यायालयीन कोठडी देण्यात आली. सत्र न्यायालयाने दोन वेळा आर्यनचा जामिन अर्ज फेटाळून लावला होता. यामुळे उच्च न्यायालयाकडून शाहरुख कुटुंबीयांना आशा आहेत. ड्रग्ज प्रकरणात मंगळवारी न्यायालयाने दोन आरोपींना जामिन दिला आहे. यामुळे आर्यनलाही जामिन मिळेल असा विश्वास आर्यनसह मूनमून आणि अरबाजच्या कुटुंबीयांना आहे. आर्यनचे परदेशात राहणारे मित्र त्याच्यासाठी पू्जाअर्चा , मंत्रजाप करत असल्याचे वृत्त आहे.

First Published on: October 27, 2021 5:57 PM
Exit mobile version