नायर हॉस्पिटलमध्ये तणाव; मृतांच्या नातेवाईकांची डॉक्टरांना मारहाण

नायर हॉस्पिटलमध्ये तणाव; मृतांच्या नातेवाईकांची डॉक्टरांना मारहाण

नायर हॉस्पिटल

मुंबईसह राज्यातील निवासी डॉक्टरांची सुरक्षा पुन्हा एकदा वादाचा मुद्दा ठरला आहे. रविवारी मुंबईतील नायर रुग्णालयामध्ये मृत रुग्णांच्या नातेवाईकांकडून तीन निवासी डॉक्टरांना मारहाण केल्याची दुदैवी घटना घडली आहे. यावेळी सुरक्षा रक्षकांकडून अडविण्याचा प्रयत्न केला असता नातेवाईकांनी रुग्णालयांच्या मालमत्तेची देखील तोडफोड केल्याची माहिती समोर आली आहे. तर रुग्णालय कर्मचार्‍यांकडून धक्काबुकी करण्यात आल्याचा आरोप नातेवाईकंकडून करण्यात आला आहे. दरम्यान, याप्रकरणी रुग्णालय आणि निवासी डॉक्टरांकडून आग्रीपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मार्ड या निवासी डॉक्टरांच्या संघटनेकडून देण्यात आली आहे.

मृतांच्या नातेवाईकांची डॉक्टरांना मारहाण

मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालयामध्ये राजकिशोर दीक्षित या ४९ वर्षीय रुग्णास काही दिवसांपूर्वी २३ क्रमांक वार्डात दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून चिंताजनक होती. त्यानंतर डॉक्टरांनी दीक्षित यांना सलायन लावण्यात आले होते. मात्र या रुग्णांनी त्यांना लावलेले सलायन काढून टाकल्याने त्यांच्या संध्याकाळी ६.३० च्या सुमारास मृत्यू झाला. त्यानंतर संतप्त नातेवाईकांनी रुग्णालयात कार्यरत असलेल्या डॉ. दिपाली पाटील, डॉ. गौरव गुंजन आणि डॉ. मोझीझ वोरा यांनी उर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. यावेळी उपस्थित सुरक्षा रक्षकांनी त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला असता त्यांना देखील धक्काबुकी केल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी जवळपास १२ ते १३ जणांच्या जमावाने वरील तिन्ही डॉक्टरांना मारहाण देखील केल्याचे समोर आले आहे. दरम्यान, या धक्काबुकीचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला आहे. दरम्यान, मार्डकडून या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला असून डॉक्टरांच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

दरम्यान, याप्रकरणी वरील तिनही डॉक्टरांनी मृत रुग्णांच्या नातेवाईकांविरोधात आग्रीपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून याप्रकरणाच्या सविस्तर चौकशी करण्याची मागणी केली आहे. डॉक्टराप्रमाणेच नायर हॉस्पिटल प्रशासनाने देखील याप्रकरणी गुन्हा दाखल केला असल्याचे मार्डने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.


हेही वाचा – डॉ. पायल तडवी प्रकरणापूर्वी नायरमध्ये ४ विद्यार्थ्यांचे रॅगिंग


 

First Published on: July 14, 2019 11:01 PM
Exit mobile version