देशभर होणार आता आयुर्वेद उपचार

देशभर होणार आता आयुर्वेद उपचार

देशभर आयुर्वेद उपचारांच्या योजना

भारतीय चिकित्सा क्षेत्रात आयुर्वेदाला अग्रस्थान देण्यासाठी तसेच योगासारख्या प्रकारातून आरोग्य जोपासण्याचा प्रचार अशा विविध माध्यमातून केंद्र सरकार प्रयत्नशील राहणार आहे. हे प्रयत्नच राष्ट्रीय आयुष मिशनचा भाग असून विविध योजना देखील संपूर्ण देशभर कार्यान्वित करण्यात येतील, अशी ग्वाही केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी दिली आहे. वरळीच्या रा. . पोदार महाविद्यालयात राष्ट्रीय आयुर्वेद परिषद आयोजित केली होती. कश्यपी आयुर्वेदिक गायनॅकॉलॉजिक अॅण्ड ऑबस्ट्रेशिअन फाउंडेशनच्या (कागोफ) वतीने आयोजित केलेली ही परिषद स्त्रीरोगतज्ज्ञांची पहिली राष्ट्रीय आयुर्वेद परिषद ठरली आहे.

या परिषदेत आयुर्वेदाच्या माध्यमातून प्रसूती तसेच बालकांचे आरोग्य या विषयावर प्रामुख्याने चर्चा करण्यात आली. दरम्यान, डॉ. बनवारीलाल गौड आणि डॉ. एन. आर. भांगळे यांना आयुर्वेदभूषण पुरस्कार देऊन यावेळी सन्मानित करण्यात आले. तसेच आयुर्वेदाच्या डॉक्टरांनी आपण उत्तम वैद्य कसे होऊ, याचा निर्धार केला पाहिजे. तसेच उपचाराची स्वतःची पद्धतदेखील विकसित केली पाहिजे. तरच आयुर्वेदाला अधिक बळकटी येईल, त्याचप्रमाणे जनमानसात देखील त्याचा अवलंब करण्यावर भर पडेल, असे विचार आयुष महाराष्ट्राचे कुलदीपराज कोहली यांनी व्यक्त केले आहे. आयुर्वेदात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल कृष्णा मित्र, प्रदीप बाबर, विजय माने, संजय लोंढे, कौशलकुमार सिंग, संजय चिट्टे यांना यावेळी विशेष सन्मानित करण्यात आहे.


हेही वाचा – कॅन्सरवरील उपचारात आयुर्वेदाची जोड लाभदायी


First Published on: October 9, 2019 6:47 PM
Exit mobile version