संप करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पगार कापणार?

संप करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पगार कापणार?

संप करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पगार कापणार?

गेल्या आठवड्यापासून विविध मागण्यांसाठी बेस्ट कर्मचाऱ्यांनी ९ दिवस संप पुकारला होता. हा संप अखेर बुधवारी मागे घेण्यात आला. मात्र पगारवाढीसाठी ९ दिवस संप करणाऱ्या सुमारे ११ हजार बेस्टच्या कर्मचाऱ्यांचा ९ दिवसांचा पगार कापण्याचा निर्णय बेस्ट प्रशासनाने घेतला आहे. दरम्यान, यातील शिवसेनेच्या कामगार युनियनचे सदस्यांनी संप संपवण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्यामुळे त्यांचा मात्र पगार कापला जाणार नाही.

बेस्टचे कोट्यावधींचे नुकसान

बेस्ट कर्मचाऱ्यांनी पगार वाढ आणि इतर मागण्यांसाठी ९ दिवस संप केला होता. या संपामुळे बेस्ट कर्मचाऱ्यांचे मात्र कोट्यावधींचे नुकसान झाले आहे. हे नुकसान लक्षात घेऊन हजारो बेस्ट कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांचा साधारण साडे चार हजार ते दहा हजारापर्यंत पगार कापला जाणार असल्याची शक्यता आहे. दरम्यान शिवसेनेच्या युनियन सदस्यांनी संप संपवण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्यामुळे त्यांचा पगार कापला जाणार नाही.

व्यवस्थापकांशी चर्चा करणार – शशांक राव

कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात होऊ नये यासाठी बेस्ट कर्मचारी युनियनचे अध्यक्ष शशांक राव मुख्य व्यवस्थापकांशी चर्चा करणार आहेत. संपाचे नऊ दिवस कर्मचाऱ्यांना पगारी रजा देण्यात यावी अशी मागणी शशांक राव करणार आहेत. पण बेस्टच्या नियमांनुसार जर एखादा कर्मचारी संपासाठी सुट्टीवर गेला तर त्याचा पगार कापण्यात येतो. त्यामुळे आता पगारवाढीसाठी संप करणाऱ्या कर्मचाऱ्यांना जानेवारीचा पूर्ण पगार मिळणार का? हे पाहणं महत्त्वाच ठरणार असून शशांक राव मुख्य व्यवस्थापकांशी चर्चा करुन काय निर्णय निघणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.


वाचा – बेस्ट कर्मचारी संपातून शिवसेनेची माघार

वाचा – बेस्टच्या संपाचा चौथा दिवस; संपामुळे बेस्टचे ९ कोटींचे नुकसान


 

First Published on: January 19, 2019 1:41 PM
Exit mobile version