घरमुंबईबेस्ट कर्मचारी संपातून शिवसेनेची माघार

बेस्ट कर्मचारी संपातून शिवसेनेची माघार

Subscribe

बेस्ट कामगार सेनेने संपातून माघार घेतल्यामुळे उद्या बेस्टच्या ५०० गाड्या पोलीस संरक्षणात धावणार आहेत. त्यामुळे मुंबईकरांना थोडासा दिलासा मिळणार आहे.

विविध प्रलंबित मागण्यांसाठी बेस्ट कर्मचाऱ्यांनी पुरकारलेल्या संपामध्ये फूट पडली आहे. शिवसेनाप्रणित बेस्ट कामगार सेनेने संपातून माघार घेतली आहे. या संपाला बेस्ट कामगार सेनेने नैतिक पाठिंबा दिला होता. मात्र मंगळवारी दुपारनंतर या संपामध्ये त्यांना सहभागी नसल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. त्याचबरोबर बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत यांनी पत्रकार परिषद घेऊन या संपातून बाहेर पडत असल्याचे सांगितले. त्यामुळे बेस्ट कामगार सेनेचे ११ हजार कर्मचारी संपातून बाहेर पडले असून आज मध्यरात्रीपासून ते कामावर रुजू होणार आहेत. बेस्ट कृती समितीने मात्र संप सुरुच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान बेस्ट कामगार सेनेने संपातून माघार घेतल्यामुळे उद्या बेस्टच्या ५०० गाड्या पोलीस संरक्षणात धावणार आहेत. त्यामुळे मुंबईकरांना थोडासा दिलासा मिळणार आहे. दोन संघटनांमध्ये फूट पडल्यामुळे इतर कर्मचाऱ्यांमध्ये रोष निर्माण झाल्यामुळे उद्या अन्नुचित प्रकार घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे ५०० बस गाड्या पोलीस संरक्षणात चालवण्यात येणार आहेत.

तोपर्यंत संप सुरुच राहणार 

बेस्ट कृती समती, बेस्ट महाव्यवस्थापक आणि मनपा आयुक्त यांच्यासोबत बैठक झाली. मात्र ही बैठक फिस्कटली. दरम्यान, बेस्ट कमिटी शिवसेनेची आहे. शिवसेना बेस्ट कर्मचाऱ्याचे प्रश्न सोडवू शकत नाही. त्यांना बेस्ट कर्मचाऱ्यांना जगावचे नाही त्यांना मुंबईच्या जनतेला सेवा द्यायची नाही. त्यांना बेस्ट संपवून बेस्टची मालमत्ता विकून काढायची आहे असा आरोप कामगार नेते शंशाक राव यांनी केला आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत संप मागे घेण्यात येणार नसल्याची भूमिका कामगारांनी घेतली असल्याचे मत देखील त्यांनी माय महानगरशी बोलताना मांडले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – 

बेस्ट संपावर, मुंबईकर तव्यावर!

- Advertisement -

मुंबईकरांच्या मदतीला धावली एसटी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -