विक्रोळी पुलाजवळ बेस्टच्या मिनी बसचा अपघात, १० ते १५ प्रवासी जखमी

विक्रोळी पुलाजवळ बेस्टच्या मिनी बसचा अपघात, १० ते १५ प्रवासी जखमी

विक्रोळी पुलाजवळ बेस्टच्या मिनी बसचा अपघात, १० ते १५ प्रवासी जखमी

मुंबईच्या पूर्व द्रुतगती मार्गावर विक्रोळी पुलाजवळ बेस्टच्या मिनी बसचा अपघात झाल्याचे समोर येत आहे. भांडूप येथून वरळीकडे ही बस निघाली होती. माहितीनुसार या बसमध्ये २० ते २२ प्रवासी होते. यापैकी १० ते १५ प्रवासी जखमी झाले असून त्यांना जवळच्या रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले आहे. सध्या या घटनास्थळी विक्रोळी पोलीस पोहोचले असून या अपघाताची आधीच चौकशी केली जात आहे.

पूर्व द्रुतगती मार्गावरून ही बेस्टची मिनी बस भांडूप कडून वरळीच्या दिशेकडे निघाली होती. त्यावेळेस विक्रोळीच्या पूलाखालून अचानक दुचाकी स्वार कट मारून पुढे जाण्याचा प्रयत्न करत होता. त्यावेळेस या दुचाकी स्वारला वाचवण्याच्या प्रयत्नामध्ये बेस्टची मिनी बस दुभाजकाला धडकून ती उलटली, अशी माहिती बसच्या प्रवाशीने दिली आहे. सध्या घटनास्थळी विक्रोळीचे वाहतूक पोलीस पोहोचले आहे. जखमी झालेल्या प्रवाशांना आजूबाजून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातामुळे पूर्व द्रुतगती मार्गावरून मुंबईकडे येणाऱ्या वाहतुकीची कोंडी झाली आहे. त्यामुळे वाहतूक सुरळीत सुरू ठेवण्याचे प्रयत्न पोलीस करत आहेत.


हेही वाचा – ‘मुंबईला अखंडित वीजपुरवठ्यासाठी विक्रोळी ४०० केव्ही उपकेंद्र प्रकल्प वेळेत पूर्ण करा!’


 

First Published on: October 17, 2020 12:19 PM
Exit mobile version