बेस्टची ‘वॅले पार्किंगची सुविधा’; आता डेपोतही गाडी पार्क करता येणार

बेस्टची ‘वॅले पार्किंगची सुविधा’; आता डेपोतही गाडी पार्क करता येणार

मुंबईत वाहनांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. वाहनांची संख्या वाढल्याने पार्किंगच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. मुंबईतील पार्किंगच्या समस्या सोडवण्यासाठी महापालिकेने आतापर्यंत अनेक उपाययोजना राबवल्या आहेत. अशातच बेस्टनेही यासाठी पुढाकरा घेतला आहे. मुंबईतील वाहनतळांची कमतरता लक्षात घेत बेस्टने वॅले पार्किंगची सुविधा उपलब्ध करून देण्याची योजना आखली आहे. तसेच, येत्या ७ ऑगस्टपासून या योजनेची अंमलबजावणी केली जाणार आहे. (Best parking space reserved for mumbaikars)

या पार्किंग सुविधेच्या माध्यमनातून बेस्टला उत्पन्न मिळणार आहे. शिवाय बेस्टच्या या सुविधेमुळे मुंबईत आता वाहन उभे करण्यासाठी मोबाईल ऍपच्या माध्यमातून जागा आरक्षित करता येणार आहे. बेस्टने आगार आणि बस स्थानकांमध्ये रिकाम्या जागी खासगी वाहनांसाठी शुल्क वाहनतळ उभे केले आहेत.

मुंबईत बेस्टची २७ आगारे आहेत. या सर्व आगारात वाहनतळ आहेत. मात्र, वाहनचालकांना गाडी पार्क करताना आगार किंवा बस स्थानकात येऊन शुल्क भरून गाडी पार्क करावी लागते. सध्यस्थितीत सर्व आगारात मिळून सरासरी २०० पेक्षा अधिक गाडी पार्क होऊ शकतात. परंतु, बऱ्याचदा गाडी पार्क करताना जागा उपलब्ध नसल्याने वाहन चालकांना पुन्हा परतावे लागते.

त्यामुळे वाहन चालकांची गैरसोय होऊ नये आणि पार्किंगच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी जागा आरक्षित करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मोबाईल ऍपच्या माध्यमातून वॅले पार्किंग सुरू करण्याचा निर्णय बेस्टने घेतला आहे.

वाहन चालकांना ‘पार्क +’ ऍपवर आगार आणि बस स्थानकातील वाहनतळांवर उपलब्ध असलेल्या जागेबाबतची माहिती उपलब्ध होणार आहे. त्यानुसार, वाहन चालकांना हव्या असलेल्या ठिकाणी गाडी पार्क करण्यासाठी जागा आरक्षित करता येणार आहे. तसेच डिजिटल माध्यमातून वाहन शुल्कही भरू शकणार आहेत.

बेस्टची ही सुविधा सुरुवातीला कुलाबा, मुंबई सेंट्रल, वरळी, दिंडोशी, वांद्रे येथे मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यासाठी दोन तासांकरिता कोणत्याही प्रकारच्या वाहनांसाठी १०० रुपये आणि दोन तासांनंतर प्रत्येक तासासाठी ३० रुपये आकारण्यात येणार आहेत.


हेही वाचा – पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरण : संजय राऊतांच्या पत्नी वर्षा राऊतांनाही ईडीचा समन्स

First Published on: August 4, 2022 6:47 PM
Exit mobile version