भिवंडी शहरात सैनिक कुटुंबियांचा सन्मान!

भिवंडी शहरात सैनिक कुटुंबियांचा सन्मान!

भिवंडी शहरात सैनिक कुटुंबियांचा सन्मान!

भिवंडी शहरातील वैद्यकीय व्यसनात सहभागी असणाऱ्या ‘भिवंडी मेडिकल प्रॅक्टिशनर्स असोशिएशन’ या संस्थेच्या माध्यमातून रविवारी १७ मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त एका आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विशेष म्हणजे या कार्यक्रमात शहरातील सैन्य दलात सहभागी होऊन देशसेवा करणा-या सैनिकांच्या कुटुंबीयांचा सन्मान करून हा दिवस साजरा केला गेला. त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करीत शिक्षण, क्रीडा आरोग्य या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्यांचा सन्मान करण्यात आला .

या कार्यक्रमाची सुरूवात महिलादिन कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉ.सुप्रिया अरवरी, डॉ. मीना जैन, डॉ. चित्रा सुतार, डॉ. स्मिता भोईर या महिला सदस्यांनी दिप प्रज्वलन करून या कार्यक्रमाची सुरूवात झाली. या असोशिएशनच्या माध्यमातून शहरात कार्य करणा-या महिला वैद्यकीय व्यासायिकांनी या जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन व्हाईट हाऊस, कोंबडपाडा या ठिकाणी केले होते .

जीवनभर मोफत आरोग्य सुविधा

या कार्यक्रमात सैन्यदलातील कॅप्टन अमितकुमार तिवारी , लान्सनायक रोहित अग्रवाल , हवालदार विनोद पाटील यांचा त्यांच्या कुटुंबियांसह स्मृतिचिन्ह, शाल देऊन गौरव करीत असतानाच त्यांच्या कुटुंबीयांना जीवनभर मोफत आरोग्य सुविधा देण्याची घोषणा डॉ कमल जैन यांनी केली . यासोबत अश्विनी मांजे – शिक्षण , सुनंदा गवळी – आरोग्य, निधी पाटील – क्रीडा यांचा सुध्दा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

या कार्यक्रमानंतर त्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे सुध्दा आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये डॉक्टर्स मंडळींनी कव्वाली, गाणी सादर करीत कार्यक्रमात रंगत आणली. तर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भिवंडी मेडिकल प्रॅक्टिशनर्स असोशिएशनचे अध्यक्ष डॉ सत्यम पेम्बाट्टला, कार्यक्रम समिती अध्यक्षा डॉ सुप्रिया अरवारी, डॉ कमल जैन, डॉ अभिषेक, डॉ.पंकज सुराना, डॉ.मीना जैन, डॉ.प्रवीण जैन यांसह असंख्य सदस्य मंडळीं यांनी विशेष मेहनत घेतली. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ सुप्रिया अरवारी, डॉ.निशा जैन, डॉ.निलाश्री केणे, डॉ.नूतन मोकाशी यांनी करीत कार्यक्रमात रंगात आणली, तर कार्यक्रमास डॉक्टर्स मंडळींचे कुटुंबीय सुध्दा उपस्थित होते .

First Published on: March 19, 2019 3:50 PM
Exit mobile version