कोकणात अमुलाग्र बदल करेल नाणार प्रकल्प, दरेकरांकडून राज ठाकरेंचे समर्थन

कोकणात अमुलाग्र बदल करेल नाणार प्रकल्प, दरेकरांकडून राज ठाकरेंचे समर्थन

कोकणात अमुलाग्र बदल करेल नाणार प्रकल्प, दरेकरांकडून राज ठाकरेंचे समर्थन

कोकणच्या विकासामध्ये एक अमुलाग्र बदल करणारा असा नाणार रिफायनरीचा प्रकल्प आहे. म्हणून राज ठाकरेंनी घेतलेली भूमिका स्वागतार्ह आहे. या रिपायनरीमुळे कोकणची अर्थव्यवस्था सुधारणार असेल आणि कोकणच्या विकासाला वेगळी दिशा मिळणार असेल तर सगळ्यांनी आणि शिवसेना प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोकणमधील नाणार रिफायनरीला समर्थन दिले पाहिजे असे वक्तव्य विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कोकणातील रिफायनही व्हावी अशी मागणी केली आहे. तसेच हा प्रकल्प महाराष्ट्रासाठी खुप महत्त्वाचा आहे. महाराष्ट्राच्या विकासासाठी या प्रकल्प अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचे सांगत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पत्रं लिहिलं आहे.

काय म्हणाले प्रवीण दरेकर

कोकणाच्या अर्थव्यवस्थेसाठी जर बळकटी येत असेल तसेच तेथील तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध होत असेल तर कोकणच्या विकासामध्ये एक अमुलाग्रह बदल करणारा असा रिफायनरीचा प्रकल्प आहे. त्यामुळे राज ठाकरे यांच्या भूमिकेचे स्वागत आहे. असे वक्तव्य विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटले आहे. जर कोकणची अर्थव्यवस्था सुधारणार असेल, कोकणच्या विकासाला वेगळी दिशा, वेगळा आया मिळणार असेल तर सगळ्यांनी आणि खास करुन शिवसेनेनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी या प्रकल्पाला समर्थि दिले पाहिजे. शिवसेनेचा उत्कर्ष वाढ ही कोकणने दिली आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेबांना कोकणवासियांनी साथ दिली आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना साथ देत आहेत. त्यामुळे कोकणासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी हा प्रकल्प केला पाहिजे असे वक्तव्य विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे.

राज ठाकरेंनी काय केली मागणी

पत्रातून कोरोनोत्तर महाराष्ट्राच्या अर्थचक्राला गती द्यायची असेल तर ‘ रत्नागिरी राजापूर रिफायनरी’सारखा प्रकल्प हातातून गमावणं ना कोकणाला परवडेल ना महाराष्ट्राला. असे आवाहन केले आहे. तर राज्याचं दीर्घकालीन हित लक्षात घेऊन ह्या प्रकल्पाच्या बाबतीत सरकारने सामंज्यस्याची भूमिका घ्यावी अशी मागणी राज ठाकरे यांनी केली. राज ठाकरे यांनी चारपानी पत्रातून राज्यातील एकूणच कोरोनामुळे बिकट झालेली अर्थव्यवस्थेत नाणार रत्नागिरी-राजापूर रिफायनरी’सारखा प्रकल्प हातून गेला तर महाराष्ट्राला परवडणारे नसल्याचे स्पष्ट मत यात नमुद केले आहे. त्यामुळे या प्रकल्पावर सरकारने सामंजस्याची भूमिका घ्यावी असे आवाहनही त्यांनी केली आहे.

First Published on: March 7, 2021 4:46 PM
Exit mobile version