मीरा रोडमध्ये भाजपाच्या महिला पदाधिकाऱ्यावर हल्ला; हाताला गंभीर दुखापत

मीरा रोडमध्ये भाजपाच्या महिला पदाधिकाऱ्यावर हल्ला; हाताला गंभीर दुखापत

भायखळ्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर अज्ञातांनी तलवारीने हल्ला केल्याची घटना ताजी असतानाच आता भाजापाच्या महिला पदाधिकाऱ्यावर धारदार शस्त्राने हल्ला केल्याची माहिती समोर येत आहे. भाजप महिला मोर्चा महाराष्ट्राच्या प्रदेश महिला प्रमुख सुलताना समीर खान यांच्या गाडीवर दोन अज्ञात इसमांनी हल्ला केला. रविवारी रात्रीच्या सुमारास मिरा रोडमध्ये ही घटना घडली. या हल्ल्यात सुलताना यांच्या डाव्या हातावर दोन ठिकाणी जखमा झाल्या आहेत. (bjp leader sultana khan attacked by unknown persons in mira road mumbai)

मिळालेल्या माहितीनुसार, भाजप महिला मोर्चा महाराष्ट्राच्या प्रदेश महिला प्रमुख सुलताना समीर खान या रविवारी रात्री त्यांच्या पतीसोबत कारने कामानिमित्त निघाल्या होत्या. त्यावेळी मीरा रोडमधील नया नगरजवळ दुचाकीवरुन तोंडाला रुमाल बांधून आलेल्या दोन तरुणांनी त्यांची गाडी अडवली. त्यानंतर त्यांनी शिवीगाळ करत गाडीवर हल्ला केला. तसेच धारदार शस्त्राने सुलताना यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यानंतर अज्ञात इसमांनी तेथून पळ काढला.

सुदैवाने यामध्ये सुलताना यांच्या हातालाच दुखापत झाली आहे. तसेच, सुलताना यांच्या पतीने आरडाओरडा करताचा परिसरातील उपस्थित नागरिकांनी तिथे धाव घेतली. त्यांनतर त्यांनी पोलिसांना या हल्ल्याची माहिती दिली. पोलिसांच्या मदतीने त्यांच्या पतीने त्यांना मीरा रोडच्या इंदिरा गांधी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेले. तिथे त्यांच्यावर उपचार करुन घरी सोडण्यात आले. त्याच्या हातावरील दोन जखमावर तीन टाके घातल्याचमं रुग्णालयाने म्हटलं आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, या घटनेनंतर सुलताना खान फारच घाबरल्या आहेत. त्या जबाब देण्याच्या स्थितीत नाहीत. आज त्यांचा जबाब नोंदवला जाईल. जबाब नोंदवून घेतल्यावर आरोपींवर पुढील कारवाई केली जाणार आहे.

दरम्यान, हल्लेखोर कोण होते आणि त्यांनी अशाप्रकारे हल्ला का केला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तर महिलेच्या पतीने ही पक्षाची अंतर्गत बाब असल्याचा संशय व्यक्त केला असून सुलताना यांनी पक्षाच्या उच्च अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली आहे, असं त्यांनी सांगितलं.


हेही वाचा – राज्यातील ‘या’ भागात यलो अलर्ट जारी, तर पुण्यात मुसळधार पावसाचा इशारा

First Published on: July 18, 2022 10:53 AM
Exit mobile version