‘लावले रे तो व्हिडिओ’ची भाजपला धास्ती; सर्व नगरसेवकांना लावले कामाला

‘लावले रे तो व्हिडिओ’ची भाजपला धास्ती; सर्व नगरसेवकांना लावले कामाला

'काही व्हिडीओ आमच्याकडे देखील आहेत बरं का'; राज ठाकरेंना प्रत्युत्तर

‘लाव रे तो व्हिडिओ’ या एका वाक्याने भारतीय जनता पार्टीची झोप उडाली असून, राज ठाकरेंच्या लाव रे त्या व्हिडिओची धूम आता मुंबईतील प्रचार सभामध्ये दिसू लागली आहे. मंगळवारी काळाचौकी इथे झालेल्या राज ठाकरे यांच्या सभेनंतर भाजपाने मुंबईतील नगरसेवकांना कामाला लावले आहे. सध्या मुंबई महानगर पालिकेमध्ये भाजपाचे ८४ नगरसेवक आहेत. भाजपाने आपल्या या ८४ नगरसेवकांना त्यांच्या संबंधीत वार्डात शिवसेना-भाजपाच्या उमेदवाराला किती मते मिळतील याचा लेखाजोखा लवकरात लवकर द्या, असे आदेशच मुंबई भाजपाने दिले आहेत. येत्या 29 एप्रिल रोजी मुंबईमध्ये लोकसभेच्या सहा जागासाठी मतदान होत आहे. त्यामुळे सध्या मुंबईत प्रत्येक पक्ष प्रचारात व्यस्त आहे. मात्र राज ठाकरे यांच्या लाव रे तो व्हिडिओमुळे भाजपा आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष धास्तावले आहेत. त्यामुळे कोणतीच रिक्स नको म्हणून भाजपा आणि शिवसेनेचे नेते कामाला लागले आहेत.

हेवेदावे सोडून कामाला लागा

सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे काही ठिकाणी युती होऊनही अजूनही मतभेद आहेत. त्यामुळे प्रत्येक नगरसेवकाने त्याच्या विभागात शिवसेना-भाजपाच्या पदाधिकाऱ्यांना घेऊन कामाला लागण्याचे आदेश देखील देण्यात आल्याची माहिती मिळत आहे. एवढेच नाही तर भाजपाची ज्या वार्डात एकगठ्ठा मते आहेत, ती मते महायुतीच्या उमेदवाराला मिळावीत यासाठी देखील प्रयत्न करा असे आदेश नगरसेवकांना देण्यात आले आहेत.

मी नुकतीच सर्व नगरसेवकांची बैठक घेतली. या बैठकीत सर्व नगरसेवकांना त्यांच्या विभागात युतीच्या उमेदवाराला अंदाजे किती मते पडू शकतात याची माहिती द्यायला सांगितली आहेत. त्यानुसार कुठे ताकद कमी आहे हे लक्षात येईल.
– आशिष शेलार, अध्यक्ष (मुंबई), भाजपा

मराठी मतांवर जास्त फोकस करा

सध्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यामुळे मुंबईतील मराठी मते फिरण्याची शक्यता वर्तवली जात असून, ही मराठी मते फुटू नयेत म्हणून नगरसेवकाना त्यांच्या त्यांच्या विभागातील मराठी मतांकडे लक्ष देण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत.

First Published on: April 25, 2019 7:00 AM
Exit mobile version