मुंबईतील लोकसभेच्या सर्व जागा भाजपच जिंकणार; आशिष शेलारांच्या सेनेला वाकुल्या

मुंबईतील लोकसभेच्या सर्व जागा भाजपच जिंकणार; आशिष शेलारांच्या सेनेला वाकुल्या

भाजप आमदार आशिष शेलार यांची टीका

आगामी लोकसभा निवडणुकीत मुंबईतील लोकसभेच्या सर्व जागा भाजपच जिंकणार, अशी घोषणाचा भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी केली आहे. सध्या मुंबईतून शिवसेनेचे तीन खासदार तर भाजपचे तीन खासदार आहेत. मात्र तरिही शिवसेनेला डावलून आपलेच सर्व खासदार निवडून येतील अशी ‘एकला चलो रे’ची भूमिका घेतल्यामुळे शेलारांनी शिवसेनेला वाकुल्या दाखवल्या असल्याचे बोलले जात आहे. भाजपतर्फे आज मुबंईत शक्तीकेंद्र प्रमुखांचे संमेलन भरविण्यात आले आहे. या कार्यक्रमात ते बोलत होते.

म्हणून काँग्रेसवाले भाजपला घाबरले

“मुंबईमध्ये भाजपची ताकद आता वाढली आहे. म्हणूनच प्रिया दत्त, संजय निरुपम आणि मिलिंद देवरा निवडणूक लढवण्यासाठी घाबरत आहेत” अशी टीका आशिष शेलार यांनी केली आहे. ‘संजय निरुपम हे तर भगोडा आहेत, ते उत्तर मुंबईमधून निवडणूक लढायला तयार नाहीत. दक्षिण मुंबईत मिलिंद देवरा पण निवडणूक लढायचं नाही असे म्हणत आहेत. तर प्रिया दत्त यांनी आधीच माघार घेतलेली आहे’, असेही शेलार म्हणाले.

आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाची रणनीती काय असेल याची माहिती बूथ प्रमुखांना देण्यासाठी हे संमेलन भरविण्यात आले आहे. २२१७ पदाधिकारी या संमेलनाला उपस्थित होते. मुंबईतील एक कोटी ४० लाख लोकांपर्यत भाजपची भूमिका पोहोचवण्याचे काम हे लोक करणार आहेत. यावेळी आशिष शेलार यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. २०१४ ला मोदींची लाट होती. मात्र २०१९ ला मोदी आणि भाजपची त्सुनामी येईल. २०१४ ला बूथ वर आमचा कार्यकर्ता काम करत होता. मात्र आता ९८ हजार कार्यकर्त्यांची फळी बूथ केंद्रावर काम करत असल्याचे आशिष शेलार यांनी सांगितले.

काँग्रेसमुळेच मराठी माणूस मुंबईतून हद्दपार

काँग्रेसने जर मुंबईत काम केले असते तर मुंबईतला मराठी माणूस बाहेर गेला नसता. मुंबईकर मुंबईतून बाहेर जाणार नाही ही भूमिका फक्त आम्ही घेतली. हात जोडून, झुकून मतदारांपर्यंत आपली कामे पोहोचावा, तर विरोधकांची ठासून त्यांच्या समोरून जा, असे आवाहनच शेलार यांनी आपल्या भाषणात कार्यकर्त्यांना केले. तसेच राहुल गांधी टीका करतात की आम्ही शेतकऱ्यांची थट्टा केली. शेतकऱ्याला प्रत्येकी १७ रुपये दिले.

मात्र आम्ही मुंबईतून एवढ्या पायाभूत सुविधा उभारल्या आहेत की, त्याचा खर्च लक्षात घेतला तर प्रत्येक मुंबईकराच्या वाट्याला दोन लाख रुपये येतील, असे वक्तव्य शेलार यांनी केले आहे.

First Published on: February 12, 2019 7:11 PM
Exit mobile version