राणेंच्या अधीश बंगल्यावर महापालिकेचे पथक दाखल; नारायण राणे पालिकेला सहकार्य करतील, महापौरांचा विश्वास

राणेंच्या अधीश बंगल्यावर महापालिकेचे पथक दाखल; नारायण राणे पालिकेला सहकार्य करतील, महापौरांचा विश्वास

राणेंच्या अधीश बंगल्यावर महापालिकेचे पथक दाखल; नारायण राणे पालिकेला सहकार्य करतील, महापौरांचा विश्वास

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जुहू येथील अधीश बंगल्याची पाहणी करण्यासाठी मुंबई महापालिकेचे पथक दाखल झाले आहे. त्यापूर्वी महापालिकेच्या पथकाने सांताक्रूझ पोलीस ठाण्यात जाऊन पोलीस संरक्षणाची मागणी केली. महापालिकेचे अधिकारी राणेंच्या बंगल्यातील अनधिकृत बांधकामाची तपासणी आणि मोजमाप करणार आहेत. यादरम्यान नारायण राणे स्वतः जुहूतील बंगल्यावर दाखल आहेत. या अनुषंगाने मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर नारायण राणे महापालिकेला सहकार्य करतील असा विश्वास आजच्या पत्रकार परिषदेत व्यक्त केला आहे.

महापौर किशोरी पेडणेकर म्हणाले की, ‘नुसत तुम्ही महानगरपालिका बघू नका. काल, परवाच केंद्राने त्यांना सीआरझेडची नोटीस दिली आहे, त्याला लक्ष द्या. केंद्रानेही सीआरझेडचे उल्लंघन झाल्याचे सांगितले आहे. महानगरपालिका आज पहिल्यांदाच राणेंच्या बंगल्यावर जात नाहीये. स्वतः नारायण राणे यांनी याआधी चारवर्षापूर्वी महापालिका आली होती. महानगरपालिकेशी बोलल्यानंतर कळले की, काही भाग अनधिकृत जाणवतोय, असे समजले. ते बघण्यासाठी महानगरपालिकेची पाहणी आहे. त्यामुळे महापालिका त्याच्यापद्धतीने काम करत आहे आणि नारायण राणे देखील नक्की त्यांना सहकार्य करतील.’

दरम्यान नारायण राणे यांच्या जुहूतील अधीश बंगल्यावर पोहोचलेल्या महापालिकेच्या पथकात आठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. महापालिकेचे अधिकारी बंगल्याची पाहणी आणि मोजणी करत आहेत. के-वेस्ट वॉर्ड अधिकारी पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली महापालिका पथकाची पाहणी सुरू आहे. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी बंगल्याचा ले-आऊट स्वतःसोबत ठेवण्याची सूचना नारायण राणे यांनी दिली आहे. त्यामुळे आज नारायण राणेंच्या बंगल्यावर महापालिकेचे पथक कारवाई करणार का? याकडे सर्वांचे लक्ष आहे.


हेही वाचा – मुंबई विद्यापीठात पुस्तके घेताहेत अखेरचा श्वास!


 

First Published on: February 21, 2022 12:02 PM
Exit mobile version