उपहारगृहांना तात्पुरती ‘पावसाळा निवारा शेड’ बांधण्याची परवानगी

उपहारगृहांना तात्पुरती ‘पावसाळा निवारा शेड’ बांधण्याची परवानगी

स्ट्रीट फुड मुंबई

कमला मिलमधील आगीच्या दुर्घटनेनंतर तत्कालिन महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी पावसाळी तात्पुरती निवारा शेड बांधण्यास परवानगी न देण्याचे निर्देश दिले होते. त्यामुळे मागील दोन वर्षांपासून हॉटेलसह खाद्यपदार्थ विक्रेत्यांना शेड बांधण्यास परवानगी दिली जात नव्हती. परंतु ही बंद विद्यमान महापालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांनी उठवली असून यापुढे पावसाळ्यात तात्पुरती शेड बांधण्यास परवानगी दिली जावी,अशाप्रकारचे परिपत्रकच सहायक आयुक्त (अतिक्रमण निर्मुलन) यांनी जारी केले आहे.

पावसाळ्यात करावा लागतो अडचणींचा सामना 

मुंबईतील उपहारगृहांना पावसाळ्या तात्पुरती निवारा शेड बांधण्यास यापूर्वी परवानगी दिली जात असहे. परंतु कमला मिल कंपाऊंडमधील ‘वन अबव्ह’ या रेस्तराँ बारच्या हुक्कापार्लरमधील पेटत्या निखर्‍याने बंदिस्त केलेल्या तात्पुरती शेडने पेट घेतल्याचे स्पष्ट झाल्यानंतर जून २०१७ रोजी तत्कालिन महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी अशाप्रकारे तात्पुरती पावसाळी शेड उभारण्यास परवानगी दिली जावू नये, असे निर्देश देत यावर बंदी घातली होती. तेव्हापासून उपहारगृहांना तात्पुरत्या पावसाळ्यात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. मात्र, काही दिवसांपूर्वी शिवसेना नेते व युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे हे शिक्षण व आरोग्य विभागाच्या आढावा बैठकीसाठी आयुक्तांना भेटण्यास आले होते. त्यावेळी काही हॉटेल असोशिएशनच्या शिष्टमंडळासोबत त्यांनी आयुक्तांशी तात्पुरती पावसाळी निवारा शेडबाबत चर्चा केली होती. त्यावेळी आयुक्तांनी तत्त्वत: मान्यता देण्याचे आश्वासन आदित्य ठाकरे यांना दिले होते. त्यानंतर आता सहायक आयुक्त (अतिक्रमण निर्मुलन) यांनी ४ जुलै २०१९ रोजी परिपत्रक जारी करून उपहारगृहांना पावसाळी शेड बांधण्यास परवानगी दिली जावी, असे निर्देश दिले आहेत.

हेही वाचा –

तिवरे धरणापासून ३५ किमी अंतरावर सापडला तिचा मृतदेह

आजपासून २४ तास विठूमाऊलीचे दर्शन

First Published on: July 4, 2019 9:33 PM
Exit mobile version