घरमहाराष्ट्रतिवरे धरणापासून ३५ किमी अंतरावर सापडला तिचा मृतदेह

तिवरे धरणापासून ३५ किमी अंतरावर सापडला तिचा मृतदेह

Subscribe

तिवरे धरण दुर्घटनेत बेपत्ता असलेल्यांपैकी एका महिलेचा मृतदेह आज आढळला.

वाशिष्ठी नदितील तिवरे धरण फुटून अनेक जण बेपत्ता झाले आहेत. या ठिकाणी राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाकडून मदतकार्य, शोधकार्य सुरू असून तिवरे धरणापासून तब्बल ३५ किमी अंतरावर एका महिलेचा मृतदेह सापडला आहे. या घटनेतील बेपत्ता असलेल्या व्यक्तींमधीलच महिलेचा हा मृतदेह असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे मृतांचा आकडा १७ वर पोहोचला असून आणखी १० जण बेपत्ता असल्याचे ट्वीट एएनआय या वृत्तसंस्थेने केले आहे.

- Advertisement -

१३ जणांचे मृतदेह सापडले

मंगळवारी रात्री चिपळूणमधील तिवरे धरण फुटल्याची घटना घडली. या घटनेत धरणाशेजारील गावांचे अतोनात नुकसान झाले. तिवरे गावातील भेंडेवाडीला या दुर्घटनेचा सर्वाधिक फटका बसला. या दुर्घटनेत २४ जण वाहून गेले होते. बुधवारपर्यंत १२ जणांचे मृतदेह हाती लागले होते. आज गुरूवारी राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाकडून मदतकार्य, शोधकार्य सुरू आहे. आज एका महिलेचा मृतदेह आढळला. त्यामुळे आतापर्यंत १३ मृतदेह सापडले असून अजून १० जण बेपत्ता आहेत.

हेही वाचा – तिवरे धरण दुर्घटना : दैव बलवत्तर म्हणून बचावले बाळकृष्ण चव्हाण

तिवरे धरणफुटी दुर्घटना

मंगळवारी रात्री ८.३० च्या दरम्यान चिपळूणमधील तिवरे धरण भरून वाहू लागले. त्यानंतर धरणाला भगदाड पडत असल्याचे लक्षात आल्याने स्थानिक तलाठ्यांनी गावकऱ्यांना खबरदारीचा इशारा दिला. पण तासाभरातच तिवरे धरण फुटले आणि धरणाखाली येणाऱ्या गावांमध्ये पाणी घुसले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -