घरमहाराष्ट्रआजपासून २४ तास विठूमाऊलीचे दर्शन

आजपासून २४ तास विठूमाऊलीचे दर्शन

Subscribe

पंढपूरमध्ये जमलेल्या सर्व विठ्ठल भक्तांना विठूरायाचे दर्शन व्हावे यासाठी आजपासून २४ तास विठ्ठल-रूक्मिणी मंदिर खुले ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

आषाढी यात्रेनिमित्त पंढरपूरमध्ये जमलेल्या भाविकांसाठी आजपासून विठ्ठल, रुक्मिणीचे दर्शन २४ तास खुले ठेवण्यात आले आहे. त्यामुळे रोज जवळपास ५० ते ६० हजार भाविकांना विठूरायाचे दर्शन घेता येईल अशी माहिती प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिली. त्याचप्रमाणे देवाचे सर्व राजोपचार आणि व्हीआयपी दर्शन बंद करण्यात आले आहेत.

देवाचे सर्व राजोपचार बंद

विठ्ठलाचे शेजघरातील तक्के, उशा, लोड देवाच्या पाठीशी ठेवण्यात आले आहेत. देवाचे राजोपचार बंद करण्यात आले असून यात्रा संपेपर्यंत रात्रंदिवस दर्शन सुरू राहणार आहे. नित्यपूजा आणि नैवेद्याचा वेळ वगळून दर्शनासाठी मंदिर 24 तास खुले राहणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा – आषाढीच्या निमित्ताने ‘अवयवदानाचे’ धडे

व्हीआयपी दर्शन बंद

यात्रेनिमित्ताने जास्तीत जास्त भाविकांना विठूमाऊलीचे दर्शन घेता यावे यासाठी विठूरायाचे व्हीआयपी आणि ऑनलाईन दर्शन यात्रा संपेपर्यंत बंद ठेवण्यात आल्याची माहिती सचिन ढोले यांनी दिली. मंदिर समितीच्या या निर्णयामुळे केवळ तासनंतास रांगेत उभे राहणाऱ्या भक्तांनाच विठ्ठलाचे दर्शन घेता येणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -