BMC Budget : बेस्टसाठी फक्त ४४ कोटींची तरतूद!

BMC Budget : बेस्टसाठी फक्त ४४ कोटींची तरतूद!

मुंबई महापालिकेचा सन २०१९-२०चा ३०६९२.५९ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांना सादर केला. ६.६० कोटी रुपये शिलकीचा अर्थसंकल्प आयुक्तांनी मांडला. चालू आर्थिक वर्षात २.६० कोटींचा शिलकीचा २७५००.५१ कोटींचा अर्थसंकल्प होता. त्यातुलनेत नव्या आर्थिक वर्षात सुमारे ३००० कोटींनी वाढ झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत ही वाढ १२.६० टक्के आहे. दरम्यान बेस्ट कर्मचाऱ्यांच्या ऐतिहासिक संपानंतर मुंबई महानगर पालिकेच्या अर्थसंकल्पामध्ये बेस्टसाठी भरीव तरतुदीचा अंदाज वर्तवला जात होता. मात्र, त्या बाबतीत बेस्ट प्रशासन आणि कर्मचाऱ्यांचा भ्रमनिरास झालेला असून बेस्टसाठी अवघ्या ३४ + १० अशी ४४ कोटींचीच तरतूद करण्यात आली आहे. अर्थसंकल्पात नमूद केलेल्या बाबी खालीलप्रमाणे:

मुंबई महानगर पालिका अर्थसंकल्प

बेस्टसाठी फक्त ३४ कोटी

बेस्टमध्ये यावर्षी १०२२ कोटी एवढा तोटा अपेक्षित आहे. सुधारणा, प्रवाशांसाठी आणि बेस्ट उपक्रमाच्या वापरकर्त्यांच्या फायद्यासाठी भांडवली स्वरुपात ३४.१० कोटींची तरतूद प्रस्तावित. कर्मचारी कल्याणकारी उपाय योजना म्हणून मोडकळीस आलेल्या निवासी वस्तींच्या दुरुस्तीसाठी १० कोटींची प्रस्तावित तरतूद


रुग्णालय व्यवस्थापन माहिती प्रणाली (एच एम आय एस)

रुग्णांचा मध्यवर्ती अभिलेख योग्य पद्धतीने ठेवता यावा यासाठी ही प्रणाली सुरू करण्यात येणार आहे. त्या अंतर्गत ३४ मॉड्युल्स अंतर्भूत आहेत. ज्यात आरोग्य सेवा कामाशी सर्व बाबी समाविष्ट करण्यात आल्या आहे. यासाठी २०१८-१९ या आर्थिक वर्षात ६८.४२ कोटींची सुधारित तरतूद आहे. तर २०१९-२० साठी २०६.२५ कोटी एवढी तरतूद आहे. मार्च २०२० पर्यंत हे कामकाज पूर्ण होणार आहे.


पालिका रुग्णालयांसाठी भांडवली तरतूद

मुंबईतल्या सर्व प्रमुख रुग्णालयांसाठी २३०. ५१ कोटींची भांडवली तरतूद करण्यात आली आहे. यात यंत्र आणि संयंत्र यासाठी १५५ कोटी आणि पायाभूत सुविधा कामांसाठी ७५ कोटींची तरतूद. कूपर आणि ट्रॉमा केअर वैद्यकीय महाविद्यालय इमारतीसाठी ३५ कोटींची तरतूद


हॉस्पिटलमध्ये यंत्रसामुग्री

२०१८-१९ मध्ये ९१.६० इतक्या किंमतीची यंत्रसामुग्री खरेदी करण्यात आली आहे. या आर्थिक वर्षात १०० कोटी किंमतीची विविध प्रकारची २६ वैद्यकीय उपकरणे उपलब्ध करून देण्याची कार्यवाही सुरू आहे. ज्यात उत्तम निदान सुविधा असलेली ३ टेस्ला एम आर आय मशीन, सीटीस्कॅन यासाठी ही प्रस्तावित तरतूद करण्यात आली आहे.


नागरी सेवांसाठी अंदाजित ९२६८.९० कोटींची तरतूद

शहरी गरीबांसाठीच्या विविध नागरी सेवांसाठी २०१८-१९ सुधारित ७२५४.४४ कोटी इतकी तरतूद तर २०१९- २० साठी अंदाजित ९२६८.९० कोटींची तरतूद


आरोग्य आणि वैद्यकीय सेवा

रुग्णांना दर्जेदार सुविधा मिळाव्यात यासाठी २०१८-१९ मध्ये आरोग्य सेवेसाठी ३६०१.८६ कोटी तरतूद करण्यात आली होती. २०१९-२० साठी नवीन रुग्णालयांच्या उभारणी आणि उपकरणांचा दर्जा सुधारावा यासाठी यंदाच्या आरोग्य अर्थसंकल्पात ४१५१.१४ कोटींची तरतूद…ही वाढ गेल्या वर्षीच्या तुलनेत जवळपास १५ टक्क्यांनी जास्त आहे.


गलिच्छ वस्ती सुधारणा

गलिच्छ वस्तींमध्ये शौचालये बांधण्यासाठी २०१९-२० च्या अर्थसंकल्पात अंदाजित १०४.४७ कोटींचा प्रस्ताव


रस्ते, वाहतूक प्रचालन आणि पूल – २२२०.८४ कोटींची तरतूद


पाणी पुरवठा योजनांसाठी १२८०.३२ कोटींची तरतूद


मलनि:स्सारण- ८६८.४२ कोटी


आरोग्य- ८०६.२३ कोटी


पर्जन्य जलवाहिन्या- ८२५ कोटी


घनकचरा व्यवस्थापन व परिवहन- ४४०.५९ कोटी


बाजार व देवनार पशुवधगृह- १५४.२३ कोटी


महापालिका मालमत्ता दुरुस्त्या व गलिच्छ वस्ती सुधारणा- ३२५.१६ कोटी


प्राथमिक शाळांच्या दुरुस्तीसाठी २६०.६४ कोटी


रुग्णालय व्यवस्थापन माहिती प्रणाली २०६ कोटींची तरतूद…


मालाड , महालक्ष्मी आणि देवनार येथे पाळीव प्राण्यांसाठी शवदाहिनीची सुविधा उपलब्ध होणार आहे. त्याकरिता ११.५० कोटींची तरतूद. तर देवनार पशुवध गृहाच्या दुसऱ्या टप्प्यातील आधुनिकीकरणासाठी २० कोटींच्या निधीची तरतूद


पशु वैद्यकीय आरोग्य खात्याकरिता गेल्यावर्षी १३.३० कोटींचा निधी देण्यात आला होता. या वर्षी अर्थसंकल्पात हीच तरतूद ३५.६० कोटींपर्यंत करण्यात आली आहे.


मुंबईकरांसाठी खुशखबर – यावर्षी कोणतीही करवाढ प्रस्तावित नाही!

नऊ प्रसूतिगृहात मध्यवर्ती मेडिकल गॅस प्रणाली पुरविण्यासाठी १.७५ इतकी तरतूद

‘आपली चिकित्सा’ प्रकल्पासाठी १६.३८ कोटींची तरतूद

 

 

कोस्टल रोड प्रकल्पासाठी १ हजार ६०० कोटींची तरतूद

मुंबईतल्या रस्ते विकासासाठी १५२० कोटींची तरतूद

बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकासाठी ५ कोटींचा निधी

गोरेगाव-मुलुंड लिंक रोडसाठी १०० कोटींची तरतूद


या बजेटमध्ये मुंबईकरांसाठी कोणत्याही प्रकारच्या मूलभूत सोयी सुविधांमध्ये अपेक्षित तरतूद नाही. खराब रस्ते, सॅनिटायझेशन, शौचालय यासाठी भरीवर तरतूद होणं गरजेचं होतं. ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांवरचा टॅक्स कमी करणार होते. काय झालं त्याचं? अर्थसंकल्पात एकप्रकारे खोटेपणा केला जात असून तो आम्ही उघड करू.

रईस शेख, नगरसेवक, समाजवादी पक्ष


हे स्वप्न दाखवणार आहे. मालमत्ता कर कुठेही माफ केलेला दिसत नाही. सेवा कर लागू करणं हे निषेधार्ह आहे. आम्ही याचा निषेध करणार आहे. गेल्या वर्षी आरोग्यासाठी ३६०० कोटी रुपयांचं बजेट सादर करूनही सेवा सुविधा मिळाल्या नाहीत आणि यंदा ४५०० कोटी रुपयांचं आरोग्य बजेट सादर केलं आहे.

रवी राजा, विरोधी पक्षनेते, मुंबई महानगर पालिका

First Published on: February 4, 2019 2:31 PM
Exit mobile version