शाब्बास BMC! ३ तासात जे.जे. रुग्णालय केले कोरडेठाक

शाब्बास BMC! ३ तासात जे.जे. रुग्णालय केले कोरडेठाक

मुंबईत मागच्या काही तासांपासून मुसळधार पाऊस बरसत आहे. त्यामुळे कधी नव्हे ते दक्षिण मुबंईतील रस्ते पाण्याखाली गेलेले पाहायला मिळाले. हवामान खात्याच्या अंदाजानुसार १०० मिमीपेक्षाही जास्त पाऊस पडल्याची शक्यता आहे. त्यामुळे आतापर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदाच जे.जे. रुग्णालयात पाणी साचले होते. रुग्ण आणि आरोग्य कर्मचारी तुंबलेल्या पाण्यात वावरतानाचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता. मात्र त्यानंतर मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांच्या मार्गदर्शनानंतर ई विभागाने Action मोडवर काम करुन केवळ तीन तासांत संपुर्ण पाणी बाहेर काढून जे.जे.रुग्णालय कोरडे केले आहे.

जे.जे. रुग्णालयात संध्याकाळच्या दरम्यान पाणी तुंबण्यास सुरुवात झाली होती. काहीच वेळात त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यानंतर अवघ्या काही तासांत महानगरपालिकेने रुग्ण आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना सुरक्षित स्थळी हलवून रुग्णालयाचा ताबा घेतला होता. ई विभागाच्या सहाय्यक आयुक्तांनी जेजे रुग्णालयात व्यक्तिश: भेट दिली. महानगरपालिकेची यंत्रणा देखील पाणी उपसा करणाऱ्‍या संयंत्रांसह हजर असल्याचे सांगण्यात येत आहे.

 

पाणी तुंबल्याचे व्हिडिओ व्हायरल केल्यानंतर आता नेटीझन्सकडून महानगरपालिकेचे कौतुक देखील होत आहे. अनेकांनी पाणी काढल्यानंतरचे फोटो ट्विट करुन महानगरपालिकेच्या कामाची प्रशंसा केली आहे.

 

 

 

First Published on: August 5, 2020 11:25 PM
Exit mobile version