मुंबईकरांनो पाणीसाठा करणाऱ्या ‘ड्रम्स’ची करा सफाई!

मुंबईकरांनो पाणीसाठा करणाऱ्या ‘ड्रम्स’ची करा सफाई!

पाणीसाठा करणारे ड्रम स्वच्छ ठेवा

मुंबईतील तब्बल १४ हजार ९३० ठिकाणी डासांची उत्पत्तीस्थाने ही पाणी साठवण्याच्या ‘ड्रम’ मध्ये आढळून आली आहेत. महापालिका क्षेत्रात किटक नियंत्रण खात्याद्वारे केल्या गेलेल्या पाहणीदरम्यान २८ हजार १६२ ठिकाणी डेंग्यू प्रसारास कारणीभूत ठरणाऱ्या ‘एडीस एजिप्ताय’ या डासांची उत्पत्ती आढळून आली आहे. यापैकी निम्म्यापेक्षा अधिक म्हणजेच ५३ टक्के डासांची उत्पत्ती ही पाणी साठवलेल्या ड्रममध्ये झाल्याचं समोर आलं आहे. तसेच ऑक्टोबर हिट यामुळे वाढलेली आर्द्रता आणि दमटपणा हे वातावरण डेंगी विषाणूच्या प्रसारास पोषक असते. याच पार्श्वभूमीवर डेंग्यूच्या प्रभावी नियंत्रणासाठी महापालिकेच्या स्तरावर अधिक प्रभावी उपाययोजना करुन मोठ्या प्रमाणात जनजागृतीची मोहिम हाती घ्यावी, असे आदेश महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.

या वर्षात डेंग्यूचे ९ बळी 

मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने गुरुवारी, ४ ऑक्टोबर प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीतून मुंबईत साथीच्या आजारांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असल्याचं समोर आलं आहे. फक्त या वर्षीच्या सप्टेंबर महिन्यात तब्बल ५ जणांना डेंग्यूमुळे जीव गमवावा लागला आहे. तर, आतापर्यंत डेंग्यूमुळे ९ जणांचा मृत्यू झाला आहे.

पाणीसाठा करणारे ड्रम स्वच्छ ठेवा

जानेवारी ते सप्टेंबरदरम्यान ९९ लाख ८१ हजार २१९ घरांची संयुक्त तपासणी केली आहे. या ९ महिन्यांच्या कालावधीत १ कोटी ७ लाख ८ हजार ९८४ पाणी साठवण वस्तूंची तपासणी करण्यात आली. या तपासणीत २८ हजार १६२ ठिकाणी डेंग्यूच्या अळ्या आढळल्या आहेत. त्यामुळे, मुंबईपालिकेने पाणी साठवणाऱ्या ‘ड्रम्स’ची योग्य पद्धतीने सफाई करावी, असं आवाहन मुंबईकरांना केलं आहे.

First Published on: October 5, 2018 9:01 PM
Exit mobile version