Covid-19 vaccination for children: ३० लाख मुलांच्या लसीकरणासाठी पालिकेची यंत्रणा सज्ज

Covid-19 vaccination for children: ३० लाख मुलांच्या लसीकरणासाठी पालिकेची यंत्रणा सज्ज

Covid-19 vaccination for children: ३० लाख मुलांच्या लसीकरणासाठी पालिकेची यंत्रणा सज्ज

मुंबईत कोरोनाची पहिली आणि दुसरी लाट पालिका आरोग्य यंत्रणेने विविध उपाययोजना करून परतवून लावली. मात्र अद्यापही कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भिती कायम आहे. याच अनुषंगाने, मुंबई महापालिका प्रशासनाने, २ ते १८ वर्षे वयोगटातील ३० लाख मुलांच्या लसीकरणासाठी एक ‘कृती आराखडा’ तयार केला आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली आहे. या आराखड्यानुसार, मुंबईतील पालिकेची मोठी रुग्णालये, उपनगरीय रुग्णालये, नर्सिंग होम आणि कोविड सेंटरमध्ये सुरू केलेल्या केंद्रांवर लसीकरण केले जाणार आहे.

या लसीकरणासाठी पालिका जनजागृती मोहीम हाती घेणार आहे. मात्र मुले आणि पालकांनी यासाठी पुढाकार घेणे आवश्यक असल्याचेही अतिरिक्त आयुक्त काकाणी यांनी म्हटले आहे. मुलांच्या लसीकरणासाठी केंद्राने निर्देश दिल्यानंतर २ ते ३ दिवसांत १५०० आरोग्य कर्मचाऱ्यांना ट्रेनिंग देऊन लसीकरण सुरू करण्यात येईल, असे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.

२ ते १८ वयापर्यंतच्या मुलांना लस देण्यासाठीची सिरींज, निडल वेगळी असण्याची शक्यता पालिका आरोग्य विभागाने वर्तवली आहे. मात्र याबाबत केंद्र सरकारकडून सविस्तर गाईडलाईन येणं आवश्यक आहे. मुलांना देण्यासाठी प्राप्त होणार लस साठा सुरक्षित ठेवण्यासाठी शीतगृह आहेत. मात्र लहान मुलांसाठीच्या लसीकरता वेगळ्या तापमानाची आवश्यकता असेल का याबाबतच्या गाईडलाईन प्राप्त झाल्यानंतर अधिक स्पष्टता येईल, असे सुरेश काकाणी यांनी सांगितले.


हेही वाचा – मनसे आक्रमक! मुंबईतील खड्ड्यांची समस्या दूर करण्यासाठी केले अनोखे आंदोलन


 

First Published on: October 14, 2021 10:15 PM
Exit mobile version