मुंबई मनपाचा अनधिकृत बांधकामांवर हातोडा

मुंबई मनपाचा अनधिकृत बांधकामांवर हातोडा

मुंबई मनपानं आता अनधिकृत बांधकामांवर हातोडा चालवण्यास सुरूवात केली आहे. मुंबई महानगर पालिकेनं पोलिसांच्या साहाय्यानं दक्षिण मुंबईतील वरळी परिसरामध्ये असणारी आणि नेहरू तारांगना जवळील बांधकामांवर कारवाई केली. ही सारी बांधकामं मुंबई मेट्रोच्या आड येत होती. शिवाय, अनधिकृत देखील होती. यावेळी मनपानं रखांगी चौकात असणाऱ्या १६ अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली. यावेळी स्थानिकांनी पालिका अधिकाऱ्यांवर दगडफेक करत आपला रोष व्यक्त केला. त्यानंतर देखील पोलिसांनी आणि मनपा अधिकाऱ्यांनी आपली कारवाई सुरूच ठेवली. दरम्यान, या कारवाईमुळे आता मेट्रोच्या कामाला गती मिळणार आहे. पण, कारवाई केलेल्या लोकांना मुंबई मेट्रोद्वारे पर्यायी जागा देण्यात येणार आहे. सहाय्यक आयुक्त देवेंद्र जैन यांनी याबाबतची माहिती दिली आहे. संध्याकाळी उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती.

वाचा – अनधिकृत संस्था,अभ्यासक्रमांना चाप

वाचा – 20 वर्षांनी अनधिकृत बांधकाम झाल्याची पालिकेला आली जाग

First Published on: December 27, 2018 5:50 PM
Exit mobile version