घरमुंबई20 वर्षांनी अनधिकृत बांधकाम झाल्याची पालिकेला आली जाग

20 वर्षांनी अनधिकृत बांधकाम झाल्याची पालिकेला आली जाग

Subscribe

12 जणांवर गुन्हे दाखल

 1998 साली पालिकेच्या आरक्षित जागेवर अनधिकृत इमारत उभारल्याप्रकरणी वसईतील 12 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणात 20 वर्षांनी पालिका प्रशासनाला जाग आल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

वसईतील तत्कालीन नगरपरिषदेच्या आरक्षित जागेवर अतिक्रमण करून वेलकास्ट या प्रख्यात कन्स्ट्रक्शन कंपनीने प्लॉटची विक्री केली. तसेच या प्लॉटवर बंगले बांधून त्यांची अन्य इसमांनी विक्री केल्याप्रकरणी वसई पोलीस ठाण्यात 12 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ओनिल आल्मेडा,मिल्टन परेरा,संजय डिकोना,शुभांगी पाटील,श्रद्धा पाटील,किशोरी गवसकर,अजय डिकोना, विल्यम डिसिल्वा,मनिष घोन्सालविस,निलेश घोन्सालविस,ऑसडन परेरा,जोसेफ रोजारियो आणि रुक्साना तुलसीधरण अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. त्यात जिल्ह्यातील अग्रगण्य बसीन कॅथॉलिक बँकेचे चेअरमन ओनिल आल्मेडा आणि प्रतिष्ठित बिल्डर मिल्टन परेरा यांचा समावेश आहे.

- Advertisement -

आल्मेडा आणि परेरा हे वेलकास्ट कन्स्ट्रक्शन कंपनीचे भागीदार आहेत.या जागेच्या एफएसआयचा वापर करून उभारण्यात आलेल्या फ्लॅटची विक्री केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.वसई नगरपरिषदेच्या राखीव जागेवर 20 फेब्रुवारी 1998 ला बनावट कागदपत्रांच्या आधारे सिडकोकडून बांधकाम परवानगी घेण्यात आली होती.त्यानंतर नगररचना विभागाकडून 8 डिसेंबर 1995 च्या कागदपत्रांची छाननी केली असता,ती बनावट असल्याचे लक्षात आले.28 फेब्रुवारी 2000 ला जिल्हाधिकारी ठाणे यांच्याकडून देण्यात आलेल्या बिनशेती कागदपत्रांची तपासणी केली असता,सदर जागेतील क्षेत्र मैदान आणि उद्यानासाठी राखीव असल्याचे समजले.त्यामुळे सहाय्यक आयुक्त मनोज वनमाळी यांनी शुक्रवारी वसई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

आरोप फेटाळले

- Advertisement -

आल्मेडा आणि परेरा यांनी मात्र, या प्रकाराचा इन्कार केला आहे.आम्ही कोणाचीही फसवणूक केलेली नाही.आमच्याकडे योग्य ती कागदपत्रे आणि पुरावा आहे.न्यायालयात ते स्पष्ट होईलच,असे त्यांनी सांगितले.तर संबधितांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत,त्याचा तपास करून दोषी व्यक्तींवर कारवाई करण्यात येईल असे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक दामोदर बांदेकर यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -