लहान मुलीचा हात पकडणे, पॅण्टची चैन उघडणे हे लैंगिक शोषण नाही – हायकोर्ट

लहान मुलीचा हात पकडणे, पॅण्टची चैन उघडणे हे लैंगिक शोषण नाही – हायकोर्ट

लैंगिक अत्याचारासंदर्भात मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने महत्वपूर्ण निर्णय दिला आहे. मुलीचा हात पकडणे आणि पॅण्टची चैन उघडी ठेवणे हे पोक्सो अंतर्गत गुन्हा ठरत नाही, असा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाने म्हटले आहे. पण दुसऱ्याबाजूला या दोन्ही गोष्टी भादंवि कलम ३५४ अ (१) (i) अंतर्गत लैंगिक शोषण म्हणून मान्य केल्या जाऊ शकतात, असे स्पष्ट करण्यात आले आहे. कलम ३५४ अ (१) (i) अंतर्गत महिलेला इच्छा नसतानाही शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडणे किंवा महिलेला अश्लील साहित्यांच्या माध्यमातून मानसिक त्रास देणे, यासंदर्भात गुन्हे येतात. यामध्ये जास्तीत जास्त तीन वर्षांच्या तुरुंगावासी शिक्षा होते.

मुलीचा हात पकडणे आणि पॅण्टची चैन उघडी ठेवणे ही गोष्ट लैंगिक शोषणाअंतर्गत येत नाही, असा निर्णय न्यायालयाच्या एकल खंडपीठाने दिला आहे. ५० वर्षीय व्यक्तीने एका ५ वर्षीय मुलीचे लैंगिक शोषण केले होते. याच प्रकरणावर न्यायमूर्ती पुष्पा गनेडीवाला हा निकाल दिला आहे. ही मुलीचे वय १२ वर्षांपेक्षा कमी असल्याने याप्रकरणातील आरोपीला सत्र न्यायालयाने पोस्को कायद्यातील कलम १० अंतर्गत दोषी ठरवले होते. याप्रकरणी आोरपी पाच वर्षांचा तुरुंगवास आणि २५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता. शिवाय त्याला सहा महिन्यांचा अतिरिक्त कारवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती.

याप्रकरणात पीडित मुलीच्या आईने तक्रार दाखल केली होती. याच तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला होता. तक्रारीत दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीचा आरोपीने हात पकडला होता आणि त्याच्या पॅण्टची चैन उघडी होती. त्यावेळी आरोपीने पॅण्टची चैन उघडून गुप्तांग बाहेर काढले आणि पीडित मुलीला आपल्या जवळ झोपण्यास सांगितले. याच प्रकरणात न्यायालयाने आपला निर्णय दिला आहे. मुलीचा हात पकडणे आणि पॅण्टची चैन उघडी ठेवणे या गोष्टींना लैंगिक शोषण म्हणता येणार नाही.


हेही वाचा – कपडे न काढता स्पर्श केल्यास लैंगिक शोषण नाही, हायकोर्टाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती


 

First Published on: January 28, 2021 2:04 PM
Exit mobile version